Breaking News
अहमदाबाद विमान दुर्घटनेत एअर इंडियाच्या बोईंग 171 फ्लाईटमधील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला असून सुदैवाने 1 प्रवासी बचावला आहे. शिवाय विमान ज्या रहिवाशी भागात कोसळले तेथील 24 जैंना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकजण गंभीरजखमी झाले आहेत. अत्यंत वेदनादायी घटनेनं देश शोकसागरात बुडाला असून मृतांच्या कुटुंबीयांवर आणि नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे.
गुरुवारी दुपारी गुजरातमधील अहमदाबाद विमान दुर्घटनेचा व्हिडिओ समोर आला अन् अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. 242 प्रवाशांसह अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरुन लंडनसाठी उड्डाण घेतलेल्या विमानाने हवेत टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या 7 मिनिटांत जवळच असलेल्या मेघानी नगर या दाट लोकवस्तीच्या भागात जाऊन हे विमान कोसळले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने व बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदतीला सुरुवात केली. मात्रअपघात एरढा भिषण होता की एअर इंडियाच्या 171 विमानातील 242 प्रवाशांपैकी 241 प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या अपघातातून आश्चर्यकारकरित्या एक जण बचावला आहे.
या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सुद्धा प्रवास करत होते. या विमानात 12 क्रू मेंबर्स आणि 230 प्रवासी प्रवास करत होते. क्रू मेंबर्समध्ये मुंबईकर अपर्णा महाडिक या सुद्धा होत्या. अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरेंचे भाचे अमोल यांच्या पत्नी होत्या. दुर्घटनाग्रस्त विमानातील एकूण 242 प्रवाशांमध्ये, 169 भारतीय प्रवासी, 53 ब्रिटीश नागरिक, पोर्तुगालचे 7 आणि कॅनडाचा एक नागरिक प्रवास करत होते. जवळील रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. या दुर्घटनेनं अवघा देश शोकसागरात बुडाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन शोक व्यक्त केला. तर, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai