Breaking News
उरण ः उरण येथील दिवाणी न्यायाधीश व प्रथम न्यायदंडाधिकारी कोर्टात प्रमुख न्यायाधिश म्हणून एम.एस.काझी, सहन्यायाधीश म्हणून एस.पी.वानखडे यांची नियुक्ती झाली आहे. यापूव जे.के. टंडन व एस. खिरापते हे सहन्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. नवीन नियुक्तीमुळे उरण कोर्टात चार न्यायाधीश कामकाज चालविणार आहेत.
उरण कोर्टात जवळपास पाच ते साडेपाच हजार प्रलंबित खटले आहेत. न्यायाधीशांची नियुक्ती केल्याने हे प्रलंबित खटले आता लवकर निघाली लागण्याची शक्यता आहे. नवीन न्न्यायाधीशांचे स्वागत उरण तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड.विजय पाटील यांनी केले. सिनिअर ऍड.मोहन मोकल व ऍड.जागृती गायकवाड यांनी सहन्यायाधीशांचे स्वागत करून सर्व नवीन न्यायाधीशांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपाध्यक्ष ऍड.किशोर ठाकूर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. उरण न्यायालयातले सर्व ज्येष्ठ, कनिष्ठ वकील यावेळी उपस्थित होते. उरण तालुक्यातील जनतेचे न्यायालयीन वाद, खटले, जलदगतीने चालवून न्याय लवकर मिळावा अशी आशा सचिव ऍड.योगेश गांगण, ऍड.निनाद नाईक,ऍड.अर्चना माळी, ऍड.अनुराग ठाकूर, ऍड.संघष गायकवाड, ऍड.रोशनी बारे, ऍड.कुंदन मुंबईकर या सर्वांनी व्यक्त केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai