Breaking News
नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरुळ येथे केलेल्या कारवाईत पोलिसांना हायड्रा गांजा आढळून आला होता. सखोल तपास केला असता या गांजाचा पुरवठा प्रकरणी नवीनचे नाव पुढे आले होते. बारा दिवसांपूव एनसीबीने त्याला मलेशिया येथून ताब्यात घेतले होते. आता नवीन चिचकरचा ताबा नवी मुंबई पोलिसांनी घेतला आहे.
2021 ते 2025 या चार वर्षात ड्रग्ज तस्करीतील पहिल्या दहा पेडररमध्ये नवीन चिचकरचे नाव घेतले जाते. नवी मुंबईतील शहाबाज गावात राहणाऱ्या नवीन आणि धीरज या भावांनी आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ पुरवठादार म्हणून गुन्हेगारी क्षेत्रात ओळखले जातात. 14 एप्रिलला नेरुळ येथे हायड्रा गांजा प्रकरणी दोन जणांना अटक केली होती. त्या वेळी हायड्रा गांजा हा गांजाचा प्रकार प्रथम उजेडात आला होता. हायड्रा गांजा हा भारतात पिकत नसल्याने हे मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याची जाणीव नवी मुंबई/अमली पदार्थ पथकाला झाली होती. त्या अनुषगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांनी तपासावर लक्ष केंद्रित केले होते. या प्रकरणी 14 ते 28 एप्रिल दरम्यान 14 जणांना अटक केले गेले. मात्र नवीन हा विदेशात असल्याने त्याच्या पर्यंत पोहचणे अवघड होते. मात्र एनसीबीने त्याला अटक केल्यावर त्याची चौकशी केली. त्यानंतर मंगळवारी त्याचा ताबा नवी मुंबई पोलिसांनी घेतला आहे. आज त्याला न्यायालय समोर उभे करण्यात येणार आहे. त्याला मिळालेल्या पोलीस कोठाडीत चौकशीत अनेक खुलासे होणार आहेत. अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली.
धीरज आणि नवीन यांचे वडील नामांकित बांधकाम व्यवसायिक होते. मात्र मुलांची नावे अमली पदार्थ तस्करी प्रकरणी समोर आल्यावर त्यांनी 25 एप्रिलला राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. सर्वप्रथम 2021 ला नवीनचे नाव अमली पदार्थ आयात आणि वितरण प्रकरणी समोर आले होते. त्याचा शोध एनसीबी घेत असल्याने त्याने 2021 मध्ये नेपाळ येथे पलायन केले तेथून दुबई येथे गेला. तेथून ऑस्ट्रेलिया जवळ असणाऱ्या वैताऊ या छोट्या देशाचे नागरिकत्व त्याने घेतले. मात्र राहण्यास तो मलेशिया येथे होता. येथूनच तो ड्रग्जचे रॅकेट चालवत होता. तो समोर आला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai