Breaking News
उरण ः उरणला रेल्वे आल्यापासून अनेक नागरिक दळणवळणासाठी रेल्वेचा मोठया प्रमाणात वापर करू लागले आहेत. मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या उरण ते बेलापूर, उरण ते नेरुळ या मार्गावर रेल्वेच्या फेऱ्या कमी व वेळेत नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या मार्गावर अत्यंत कमी फेऱ्या आहेत. या मार्गावर जास्तीत जास्त फेऱ्या वाढवाव्यात व ठाणे, सीएसएमटी, पनवेल या ठिकाणी थेट रेल्वे सेवा सुरु करून या ट्रेनच्या फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्ष व युवा सेनेच्या वतीने पत्रव्यवहार करून करण्यात आली आहे.
उरणचा इतिहास व भूगोल असताना मध्य रेल्वेने द्रोणागिरीच्या विकासासाठी हातभार लावण्यासाठी उरण ते सीएसएमटी व उरण ते पनवेल व उरण ते ठाणे ट्रेन सूरू करून लोकलच्या फेऱ्यामध्ये वाढ करावी. सध्या स्थितीत उरण ते नेरूल व उरण ते बेलापूर लोकल सूरू आहे. परंतू मुंबई व पनवेल हे ट्रेन नसल्यामुळे चाकरमान्यांना नेरूल व बेलापूरला उतरून पुढील ट्रेन पकडावी लागते. सदर ट्रेन मध्ये खूप गर्दी असल्यामुळे दाटी वाटीने उभ्याने प्रवास करावा लागतो. प्रवाशांच्या शारिरीक वा मानसिक त्रास कमी करण्यासाठी व सुरक्षित प्रवासाठी मध्य रेल्वेने उरण ते मुंबई व उरण ते पनवेल व उरण ते ठाणे अश्या ट्रेन सुरू करून पॅसेंजर ट्रेनच्या फेऱ्या वाढवून तमाम द्रोणागिरी वाशियांना, चाकरमान्यांना आणि उरणच्या प्रवाश्यांना दिलासा द्यावा अशी मागणी पत्रव्यवहारच्या माध्यमातून शिवसेना द्रोणागिरी शहर शाखा प्रमुख जगजीवन भोईर,युवासेना उरण तालुका अधिकारी करण हरिश्चंद्र पाटील तसेच विभागप्रमुख रुपेश पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai