Breaking News
उरण : पाकिस्तानने यूएईमार्गे जेएनपीए बंदरात पाठवलेले 39 कंटेनर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. यात नऊ कोटी रुपयांचे पाकिस्तानी बनावटीचे 1,115 मेट्रिक टन खजूर आणि गरम मसाले जप्त केले आहेत. या प्रकरणी एका आरोपीला अटक केल्याची माहिती डीआरआयच्या मुंबईतील अधिकाऱ्यांनी दिली.
वाहतुकीवरील निर्बंधांचे उघडपणे उल्लंघन करून पाकने ओळख लपवून हे 39 कंटेनर थेट दुबई, यूएईमार्गे जेएनपीए बंदरातून भारतात पाठविले. पाकिस्तानच्या या कारनाम्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली. अन्य देशांच्या मार्गे प्रामुख्याने दुबई, यूएई यासारख्या देशांद्वारे होणारी पाकिस्तानी बनावटीच्या वस्तूंची बेकायदेशीर आयात रोखण्यासाठी डीआरआयने ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट ही मोहीम सुरू केली आहे. दुबई, यूएई यासारख्या देशांद्वारे होणारी पाकिस्तानी बनावटीच्या वस्तूंची बेकायदेशीर आयात रोखण्यासाठी डीआरआयने ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट अंतर्गत जेएनपीए बंदरातून 39 पाकिस्तानी कंटेनर जप्त केले.
सुरुवातीला हा माल एका कंटेनर आणि जहाजावरून पाकिस्तानातून दुबईला नेण्यात आला आणि नंतर तो भारताकडे जाणाऱ्या दुसऱ्या कंटेनर आणि जहाजांवर हलवण्यात आला. मालाच्या तपासणीदरम्यान पाकिस्तानची हेराफेरी उघडकीस आली. हा माल पाकिस्तानच्या कराची बंदरातून निघाला आणि दुबईतील जबेल अली बंदरावर तो भारताकडे जाणाऱ्या जहाजांवर चढवण्यात आला. याशिवाय, पाकिस्तानी संस्थांबरोबर झालेले पैशांचे हस्तांतरण/आर्थिक संबंध उघडकीस आले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai