Breaking News
पनवेल : पनवेल, नवी मुंबई, मुंबई परिसरामध्ये नोकरीच्या अनेक संधी तरुणांसाठी उपलब्ध आहेत. त्या तरुणांना रोजगार मिळण्यासाठी एक पाऊल म्हणून 29 जून रोजी भारतीय जनता पार्टी प्रितम म्हात्रे जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत जॉब इंटरव्यूचे आयोजन केले होते. यावेळी बायकर, बॅक ऑफिस, ऑपरेशन स्टाफ, पिकर पॅकर, फिल्ड ऑडिटर, डिलिव्हरी एक्झिक्यूटिव्ह, सपोर्ट स्टाफ, व्हॅन बॉय, काउंटर स्टाफ इन्स्टॉलर /हेल्पर, फार्मासिस्ट या पदासाठी जॉब इंटरव्यू घेण्यात आले.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 500 पेक्षा जास्त तरुणांनी नोंदणी केली होती. यावेळी तरुणांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार मुलाखत घेऊन त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना विविध प्रकारच्या नोकरीच्या संधी देण्यात आल्या. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पनवेलचे जे एम म्हात्रे यांची उपस्थिती होती. नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊन प्रितम म्हात्रे यांनी अशा प्रकारे संधी मिळवून दिली त्याबद्दल तरुणांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
नोकरी करत असताना आपल्या गुणवत्तेच्या अनुसार योग्य ठिकाणी संधी उपलब्ध व्हावी या हेतूने आम्ही या जॉब इंटरव्यूचे आयोजन केले होते. गुणवत्तेनुसार त्यांना उपलब्ध असलेल्या एक पेक्षा अनेक संधी आम्ही त्यांच्यापर्यंत आज या शिबिराच्या माध्यमातून पोहोचवल्या. भविष्यात अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याचा आमचा मानस आहे. पनवेल परिसरात येणाऱ्या नोकरीच्या संधीसाठी तरुणांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण शिबिर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबविणार असल्याचे प्रितम म्हात्रे यांनी सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai