Breaking News
महिलांनी काढला मोर्चा
उरण ः उरण तालुक्यात अनेक गुन्हे वाढत आहेत. आता त्यात भर म्हणून अनेक ठिकाणी खुलेआम सर्व्हिस रोडवर, सार्वजनिक ठिकाणी मद्यपी बिनधास्तपणे ग्रुप करून दारू पीत असून मोठ्या प्रमाणात नशा सुद्धा करत आहेत. मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई होताना दिसून येत नाही. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामस्थ मंडळ सोनारी व ग्रामस्थ तसेच महिला वर्गाच्या वतीने जेएनपीटी प्रशासनाकडे व न्हावा शेवा बंदर पोलीस प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला करून या प्रकाराला आळा घालण्याची मागणी केली आहे. तसेच यावेळी सर्व्हिस रोड वर महिलांनी मोर्चा काढून मद्यपीचा पोलीस प्रशासनाने कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी केली.
उरण तालुक्यातील करळ फाटा हे अति महत्त्वाचे ठिकाण आहे. उरण मध्ये येण्यासाठी व उरण मधून बाहेर जाण्यासाठी नागरिकांना या स्टॉप वरूनच पुढचा प्रवास करावा लागतो. गावातील महिला, शाळा कॉलेजमधील मुल-मुली,ज्येष्ठ नागरिक हे देखील इथूनच प्रवास करीत असतात मात्र करळ फाट्यावर जेएनपीटी प्रशासनाच्या सर्विस रोडलगत मदयपी दारुडे हे दारू, गांजा चरस अफू आदी नशेच्या पदार्थ्यांचे सेवन करत आहेत. त्यामुळे व्यसनी लोकांचा वावर येथे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यांची दादागिरी हुकुमशाही वाढली असून सदर मद्यपी व्यसनी व्यक्ती ग्रुप करून एकत्र बसून खुलेआमपणे दारू पीत गांजा ओढत रस्त्यावरच ठाण मांडून बसत आहेत. त्यामुळे सोनारी, करळ व आजूबाजूच्या गावांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर रस्त्यावरून घरी जाताना महिलावर्ग शाळा कॉलेजमधील मुलींना शरमेने मान खाली घालून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. संध्याकाळी 6 वाजले की हे लोक रस्त्यावर सर्विस रोड जवळ बसतात व रात्री बारा एक वाजेपर्यंत हे लोक ग्रुप करून दारू पिण्यासाठी खुलेआमपणे बिनधास्त बसतात. कोणाचाही वचक त्यांच्यावर राहिला नाही. याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष कसे गेले नाही का असा प्रश्न सुज्ञ नागिराकांनी उपस्थित केला आहे.
या मद्यपींना वेळीच आळा घातला नाही तर चोरी विनयभंग, खून दरोडे बलात्कार यासारख्या घटनांना प्रोत्साहन मिळू शकते. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या दुर्घटनेपासून वाचण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ मंडळ सोनारी व ग्रामस्थ तसेच महिला वर्गाच्या वतीने जेएनपीटी प्रशासनाकडे व न्हावा शेवा बंदर पोलीस प्रशासनाकडे पत्रव्यवहाराद्वारे केली आहे. तसेच या प्रकाराला आळा बसावा तसेच मद्यपीचा पोलीस प्रशासनाने कायमस्वरूपी बंदोबस्त करावा म्हणून महिलांनी करळफाटा सर्विस रोड वर मोर्चा काढला होता.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai