मराठवाडा जनविकास फाऊंडेशनच्या सचिवपदी अनिल शिरसाठ
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 28, 2021
- 812
नवी मुंबई ः तुर्भे स्टोअर्स नवी मुंबई येथील कार्यकर्ते अनिल रामचंद्र शिरसाठ यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन त्यांची मराठवाडा जनविकास फाऊंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष, दिपक लोमटे यांनी त्यांची मराठवाडा जनविकास फाऊंडेशन सचिव पदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबद्दल शिरसाठ यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
दिपक लोमटे यांनी मला संस्थांच्या सचिवपदाची जबाबदारी देऊन माझ्यावर जो विश्वास दाखविला तो विश्वास संस्थांच्या माध्यमातून गोर गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देऊन सार्थ ठरवेन तसेच संपुर्ण संस्थांचे विचारधारा घरोघरी पोहचवून मराठवाडा जनविकास फाऊंडेशन मजबुत करणार असल्याची प्रतिक्रिया अनिल शिरसाठ यांनी दिली आहे. या नियुक्तीबद्दल मराठवाडा जनविकास फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अशोक गायकवाड, कार्याध्यक्ष भाऊराव भालेराव, सरचिटणीस मिलिंद मस्के , सुनिल साबळे यांच्यासह इतर पदाधिकार्यांनी शिरसाठ यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai