मतदारांची 31 मेपर्यंतची नावे अंतिम होणार
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 10, 2022
- 668
नवी मुंबई : कोरोना संक्रमणामुळे दोन वर्ष लांबणीवर पडलेल्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयारी करण्यात येत आहे. यापूर्वी महापालिका निवडणुकीसाठी 5 जानेवारीपर्यंतची मतदार यादी अंतिम करण्यात आली होती. मात्र पुन्हा निवडणूक पुढे गेल्याने आता 31 मेपर्यंतची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदारांची संख्या आणखी वाढणार आहे. 5 जानेवारीपर्यंत 8 लाख 94 हजारांपेक्षा अधिक मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. यात ऐरोली मतदारसंघात 4,99,653, तर बेलापूर मतदारसंघात 3,94842 इतके मतदार होते. यात आता आणखी वाढ होणार आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुका पुढील काही महिन्यांत होणार असून त्या दृष्टीने निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरू आहे. प्रभाग रचना व आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगानेही निवडणुकीसाठीच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम निश्चित केला आहे. यानुसार 17 जूनला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. 5 जानेवारीपर्यंतची मतदार यादी निश्चित करण्यात आली होती; परंतु आता 31 मे 2022 पर्यंतची अद्ययावत मतदार यादी केली जाणार आहे.
- मतदार यादी कार्यक्रम
- 17 जून - प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध
- 25 जून - प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai