सीबीएसई नर्सरी प्रवेशासाठी झुंबड
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 24, 2023
- 412
240 जागांसाठी 1100 अर्ज
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या सीबीएसई शाळांतील नर्सरीच्या वर्गासाठी 2023-24 करिता प्रवेश प्रक्रियेस गेल्या शुक्रवारपासून प्रारंभ करण्यात आला. सीवूड्स व कोपरखैरणे येथील दोन्ही शाळेत मिळून एकूण 240 प्रवेश देण्यात येणार असून यासाठी झुंबड उडाली आहे. आतापर्यंत 1100 अर्ज प्राप्त झाले आहेत. 25 मार्चपर्यंत अर्ज स्विकारले जाणार असून हा आकडा आणखी वाढणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे कोपरखैरणे, सेक्टर-11 आणि नेरूळ, सेक्टर-50 या ठिकाणी सीबीएसई बोर्डाशी संलग्न शाळा चालू करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्ये नर्सरी वर्गाकरीता प्रवेश प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. हा प्रवेश पूर्णत: निःशुल्क असल्याने या सुविधेचा लाभ पालकांनी घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. पालिकेच्या शाळांना मागील अनेक वर्षापासून चांगला प्रतिसाद मिळत असून यंदा 240 जागांसाठी आतापर्यंत 1100 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या सीबीएसई शाळांना आतापर्यंत अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोपरखैरणे येथील पालिका चालवत असलेल्या शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने पालिकांची नाराजी असली तरी दुसरीकडे मोफत सीबीएसई शाळेत प्रवेश घेण्यासाठी मात्र पालकांनी मोठी मागणी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोपरखैरणे येथील शाळा महापालिकेच्या वतीने तर सीवूड्स येथील शाळा खासगी संस्थेच्यावतीने चालवण्यात येत आहेत. नर्सरी प्रवेशासाठी आतापर्यंत 240 जागांसाठी 1100 अर्ज प्राप्त झाले आहेत. कोपरखैरणे व सीवूड्स येथील शाळेत प्रत्येकी 120 प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामुळे अर्ज करण्याच्या मुदतीनंतर अर्जांची छाननी करुन नंतर लॉटरी काढण्यात येणार आहे.
- प्रवेशासाठी आवश्यक बाबी
प्रवेशासाठी पाल्याचे वय 3 वर्षे पूर्ण (31 डिसेंबर 2023 दिवसापर्यंत) असणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी पाल्याचा जन्मदाखला, जातीचा दाखला, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र,आधारकार्ड, वडिलांचा रहिवासी पुरावा ही कागदपत्र आवश्यक असणार आहेत. प्रवेश अर्ज संबंधित शाळेत 25 मार्च पर्यंत सर्व कागद पत्रांसह भरून देणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी शाळेपासून 1 कि.मी. चे आत अंतरावर राहणा-या विदयार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रवेशासाठी क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आल्यास नियुक्तीसाठी लॉटरी पध्दत अवलंबवण्यात येणार आहे. सकाळी 11 ते 2 या वेळेत प्रवेश अर्ज देण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai