केबीपी कॉलेजमध्ये लक्ष्मीबाई पाटील पुण्यतिथी निमित्त चर्चासत्र
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 24, 2023
- 536
नवी मुंबई : रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या 93 व्या पुण्यतिथी निमित्त नुकतेच चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्य उत्पादन शुल्क अधिकारी जयवंत पाटील हे प्रमुख पाहुणे तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभदा नायक उपस्थित होत्या.
यावेळी कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्यात समर्थपणे साथ देणाऱ्या लक्ष्मीबाईच्या कार्यांचा आढावा घेतला. तर लक्ष्मीबाईनी वेगवेगळ्या प्रसंगात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे रयत शिक्षण संस्थेची वाटचाल कशी मजबूत होत गेली. तसेच बहुजनांच्या कल्याणासाठी त्यांनी केलेला त्याग महाराष्ट्राला कायम प्रेरणा देणारा आहे असे जयवंत पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.
रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रेमळ हृदयाची आणि मोठ्या त्यागाची जाणीव ठेवून रयत सेवकांनी वाटचाल केली पाहिजे असे मत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभदा नायक यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला सक्षमीकरण समितीच्या चेअरमन ग्रंथपाल मानसी रसाळ यांनी केले. यावेळी डॉ. भारती पाटील यांनी लक्ष्मीबाई पाटील यांच्या जीवनावर आधारित एका कवितेचे वाचन केले. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव डॉ. जे.जी. जाधव, उपप्राचार्य सी.डी. भोसले, उपप्राचार्य चंद्रकांत क्षीरसागर तसेच शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai