नमुंमपा 6 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 04, 2023
- 334
नवी मुंबई ः कर्मचारी सेवानिवृत्त होत असताना संस्थेच्या कामाशी संबंधित अनुभवी व्यक्ती निवृत्त होत असल्याने त्या संस्थेची काही प्रमाणात हानी होते. तथापि विहित वयोमानानुसार सेवानिवृत्ती अनिवार्य असल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सुरु होणाऱ्या आयुष्याच्या दुसऱ्या इनिंगसाठी शुभेच्छा देणारा व त्यांच्या आजवरच्या कामाचा यथोचित गौरव करणारा निरोप समारंभ हा त्या कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातील अत्यंत समाधानाचा क्षण असल्याचे व त्याबरोबरच संस्थेशी त्याचा असलेला रोजचा संपर्क उद्यापासून नसणार त्यामुळे हळवा करणाराही क्षण असल्याचे सांगत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी मार्च महिन्यात सेवानिवृत्त होणाऱ्या पालिकेच्या 6 अधिकारी, कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.
31 मार्च रोची मार्च महिन्याच्या अखेरच्या दिवशी सेवानिवृत्त होणारे 6 महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी लेखा अधिकारी रमेश सोनारे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते अग्निशमन केंद्र अधिकारी गणेश पाटील, प्राथमिक शिक्षिका वर्षा नरेश पाटील, स्टाफ नर्स / मिडवाईफ उषा पुष्पसेन सुर्यवंशी (शिंदे), माहिती नोंदणीकार लिपिक सरला सतीश देशमुख (भावसार), आरोग्य सहाय्यक गीता चंद्रकांत तांबडे यांना आयुक्त महोदयांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. लेखाधिकारी रमेश सोनारे यांनी आपल्या महानगरपालिकेतील 28 वर्षांच्या कार्यकालावधीत लेखा विषयक कामांमध्ये अत्यंत जबाबदारीने व सर्वांशी उत्तम संबंध ठेवून चांगली कामगिरी केली असल्याचे आयुक्तांनी विशेषत्वाने नमूद केले. 2007 मध्ये सावला कोल्ड स्टोरेज, सानपाडा याठिकाणी लागलेल्या आगीत गणेश पाटील यांनी साहसी कामगिरी केल्याबद्दल त्यांना 26 जानेवारी 2008 रोजी प्रजासत्ताक दिनी गुणवत्तापूर्ण सेवेचे राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले होते. असे अनुभव संपन्न अधिकारी सेवानिवृत्त होत असल्याने महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाची कार्यालयीन हानी होत असल्याचेही आयुक्त राजेश नार्वेकर यांनी मत नोंदविले. याशिवाय शिक्षण, आरोग्य, कार्यालयीन कामकाज यामध्येही चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवेचाही गौरव आयुक्तांनी केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai