‘दक्षिण’ फेस्टिव्हलची मेजवानी
- by मोना माळी-सणस
- Jan 21, 2026
- 84
कोर्ट यार्ट मॅरियट येथे साऊथ इंडियन जेवणाची लज्जत चाखण्याची संधी
नवी मुंबई ः कोर्ट यार्ट मॅरियट यांच्या नेरुळ येथील हॉटेलमध्ये 10 दिवसीय दक्षिण भारतातील पदार्थांची मेजवानी चाखण्याची संधी मिळणार आहे. 23 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीमध्ये ‘दक्षिण’ या फुड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दक्षिण भारतातील सहा राज्यातील प्रसिद्ध आणि चविष्ट पदार्थांची रेलचेल असणार आहे. दहा दिवस चालणाऱ्या या खाद्य महोत्सवात दररोज रात्रीच्या जेवणासह विशेष रविवार ब्रंचद्वारे अस्सल दाक्षिणात्य पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. या महोत्सवाचा जास्तीत जणांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केलेआहे.
नेरूळ येथील मॅरियट कोर्टयार्ड हॉटेलद्वारे नेहमीच वेगवेगळ्या राज्यातील फुड फेस्टिव्हलचे आयोजन करुन नवी मुंबईकरांना विविध राज्यातील खाद्यसंस्कृतीची मेजवानी दिली जाते. आता 23 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान येथे ‘दक्षिण’ म्हणजेच साऊथ इंडियन फुड फेस्टिव्हल चे आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण फूड फेस्टिव्हलमुळे दक्षिण भारतातील विविध पदार्थांचे दर्शन घडणार असून चव चाखता येणार आहे. तामिळनाडू येथील प्रसिद्ध शेफ मुथू कृष्णन यांनी बनवलेले पदार्थ पंगतीत असणार आहेत. दक्षिण भारतातील तामिळनाडू, आंध्र, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, पाँडेचेरी येथे प्रसिद्ध असणारे पारंपरिक पदार्थांची मांदियाळी या महोत्सवात असणार आहे. त्यामध्ये बेनी डोसा, आंद्रस्पेशल टोमॅटो पप्पू, मागांचारु, कुरमा, बनाना चिप्स, थाय कुरुमा, चिकन चेट्टीनार, चक्रापट्टी, गोबी पुलाव, वेगवेगळ्या चटण्या अशा साऊथ इंडियन पदार्थांची लज्जत चाखता येणार आहे.
नवी मुंबई, पनवेल, मुंबई, ठाणे आणि उरण येथील नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह व मित्रपरिवारासह या उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन मॅरियट कोर्टयार्डचे जनरल मॅनेजर शुभ्रतो रॉय यांनी केले. हा फूड फेस्टिव्हल एफ अँड बी मॅनेजर रंजन आलू आणि एक्झिक्युटिव्ह अविनाश नलावडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला आहे. 10 दिवस चालणाऱ्या या दक्षिण फेस्टिव्हलदरम्यान नेरुळ कोर्ट यार्ट मॅरियट येथे सायकांळी 7 ते 11 या वेळेत व रविवारी विशेष ब्रंचद्वारे अस्सल दाक्षिणात्य खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी येण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस