लॉरेएट हायस्कूलचा 25 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 06, 2026
- 28
नवी मुंबई ः मिलियन चॅरिटेबल ट्रस्ट संचालित लॉरेएट हायस्कूलचा 25 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहा पार पडला. यावेळी पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी शाळेतील शिक्षकांनी 25 नृत्यांचे प्रशिक्षण दिले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे सर्वेसर्वा प्रकाश पाटील व उपाध्यक्ष प्रभावती पाटील यांची कन्या प्रतिभाताई यांना दोन मिनिटं उभे राहून सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली. वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन केले, दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. संस्थेच्या वतीने मान्यवरांचा स्मृतिचिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली या कलेच्या माध्यमातून गणेश वंदना, मंगळागौर, लावणी, शिवतांडव तसेच विविध पारंपरिक नृत्य सादर करून मान्यवर व प्रेषकांची मने जिंकली. या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये सूत्र संचालनाची जबाबदारीसुद्धा विद्यार्थ्यांवर सोपवण्यात आली होती. यामध्ये आदर्श जाधव, ध्रुवी कारोत्रा, स्मृती गोपाल यांनी उत्कृष्टरित्या आपल्या शैलीमध्ये सूत्रसंचालन केले. उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षिका मनीषा शिंदे, आदर्श विद्यार्थिनी ईश्वरी शिंदे, विद्यार्थी अंकित यादव, डॉक्टर प्राची पाटील, डॉक्टर प्रज्ञा पाटील डॉक्टर झाले असल्यामुळे वन मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.
वर्धापन दिनाच्या निमित्ताने वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की कोपरखैरणे येथे एका छोट्या जागेमध्ये आज पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण दिले जाते हे खरोखर ही कौतुकास्पद बाब आहे. आज लहान मुलांपासून ते दहावीपर्यंतच्या मुलांचे नृत्य पाहिल्यावर त्यांना घडवण्याच्या मागे व्यवस्थापक व शिक्षकांचा मोठा सिंहाचा वाटा असल्याचे दिसते. लवकरच या शाळेची स्वतःची इमारत व्हावी मैदान व्हावं अशी अपेक्षाही या निमित्ताने गणेश नाईक यांनी व्यक्त केली. पालकांनी आपल्या मुलांची नृत्य पाहिली छोट्या जागेत सुद्धा विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत परंतु त्याच बरोबर विद्यार्थ्यांच्या कलेला सुद्धा एक संधी देण्याचे काम व्यवस्थापक व शिक्षक यांनी केल्यामुळे पालकांनी प्रकाश पाटील, प्रभावती पाटील यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, ज्ञान प्रसारक संस्थेचे कोपरखैरणेचे सर्वेसर्वा ऍडवोकेट पी सी पाटील रा .फ.नाईक विद्यालयाच्या प्राचार्य प्रताप महाडिक, लॉरेएट हायस्कूलचे सर्वेसर्वा प्रकाश पाटील, उपाध्यक्ष प्रभावती पाटील ,न्यू मॉर्डन स्कूलचे सर्वेसर्वा बसवराज लाच्याने इंद्रावती स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रमिला माने, विजेता स्कूलच्या मुख्याध्यापिका फरीदा शेख, डॉक्टर मनीषा सानी, डॉक्टर प्राची पाटील, डॉक्टर प्रज्ञा पाटील, महिला मंडळाच्या अध्यक्षा शोभा तांडेल, निशा म्हात्रे व अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai