कोरोनाबाधित दिवंगतांच्या वारसांना कामगार कल्याण निधीची रक्कम प्रदान
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 10, 2020
- 876
नवी मुंबई ः महानगरपालिका आरोग्य सेवेतील जे अधिकारी, कर्मचारी कोव्हीड 19 शी संबंधित काम करीत असताना दुर्दैवीरित्या मृत्यूमुखी पडतात त्यांच्या वारसांना केंद्र सरकारच्या ’प्रधान मंत्री गरीब कल्याण पॅकेज : इन्शुरन्स स्कीम फॉर हेल्थ वर्कर्स फाईटींग कोव्हीड-19’ या योजनेअंतर्गत रु.50 लक्ष रकमेचे ’सुरक्षा विमा कवच’ तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामगार कल्याण निधीमधून विशेष सानुग्रह अनुदान म्हणून रू. 25 लक्ष अशी एकूण रू. 75 लक्ष रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
त्याचप्रमाणे आरोग्य सेवेव्यतिरिक्त महानगरपालिका आस्थापनेवरील कोरोना विषयक सर्वेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंध, चाचणी, उपचार व मदतकार्य या कार्यवाहीच्या कर्तव्यावर असणा-या अधिकारी, कर्मचारी यांचा कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊन दुर्देवी मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना महानगरपालिकेच्या कामगार कल्याण निधीतून रुपये 50 लक्ष रक्कमेचे विशेष सानुग्रह अनुदान देण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.
त्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विमा कवच योजना समितीच्या दि. 25 ऑगस्ट 2020 रोजी झालेल्या बैठकीमध्ये 2 दिवंगत वाहनचालक कर्मचारी यांच्या वारसांना केंद्र सरकारच्या ’प्रधान मंत्री गरीब कल्याण पॅकेज : इन्शुरन्स स्कीम फॉर हेल्थ वर्कर्स फाईटींग कोव्हीड-19’ योजने अंतर्गत रु. 50 लक्ष रकमेचे ’सुरक्षा विमा कवच’ बँकेव्दारे मिळणेबाबतची पुढील कार्यवाही करणे व त्यांचे वारस तपासून महानगरपालिकेच्या कामगार कल्याण निधीमधून प्रत्येकी 25 लक्ष रक्कमेचे विशेष सानुग्रह अनुदान देणेस मंजूरी देण्यात आली. तसेच दिवंगत कनिष्ठ अभियंता यांच्या वारसास महानगरपालिकेच्या कामगार कल्याण निधीतून रुपये 50 लक्ष रक्कमेचे विशेष सानुग्रह अनुदान देण्याचे मंजूर करण्यात आले आहे.
त्यानुसार दिवंगत वाहन चालक संभाजी भास्कर यशवंतराव यांच्या पत्नी श्रीम. जयश्री संभाजी यशवंतराव यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामगार कल्याण निधीमधून विशेष सानुग्रह अनुदान म्हणून रू. 25 लक्ष रक्कमेचा धनादेश अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. इतरही दोन कर्मचा-यांच्या वारसांना विशेष सानुग्रह अनुदान रक्कम प्रदान करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai