950 पोलीसांना कोरोना संसर्ग
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 22, 2020
- 485
पनवेल : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असला तरी जिवाची पर्वा न करता पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. नवी मुंबई पोलीस दलातील 950 जणांना आतापर्यंत करोनाचा संसर्ग झाला आहे तर 9 जणांचा बळी गेला आहे.
नवी मुंबई पोलीस दलातील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करणारे शांतिलाल कोळी यांचा रविवारी डी. वाय. पाटील रुग्णालयात करोना उपचार सुरू असताना मृत्यू झाला. कोळी हे 55 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. कोळी हे सीबीडी बेलापूर येथील पोलीस वसाहतीमध्ये राहत होते. सध्या ते एनआरआय पोलीस ठाण्यात कार्यरत होते. 15 सप्टेंबरपासून त्यांना करोनाची लक्षण दिसू लागल्याने डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai