एकापाठोपाठ आदळल्या 25 गाड्या
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 30, 2020
- 628
पनवेल : सायन पनवेल महामार्गावरील महत्वाचा असलेल्या कळंबोली उड्डाणपुलावर एकापाठोपाठ तब्बल 25 गाड्या आदळल्याची घटना घडली. सकाळी 10.30 च्या सुमारास महामार्गावरील काँक्रिटच्या रस्त्यावर पडलेल्या भेगांमध्ये डांबर भरण्याचे काम सुरु होते. कामगार रस्त्यावर असताना त्यांनी हलगर्जीपणा केल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. काम सुरु असताना वाहनांना मार्गदर्शन करणारे फलक, झेंडे किंवा निशानी ठेवण्यात आली नसण्याची शक्यता आहे. यामुळे वाहन चालकांच्या लक्षात न आल्याने एकामागोमाग एक येत असलेली वाहने एकमेकांवर धडकली. या अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai