17 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 24, 2020
- 559
नवी मुंबई : शाळेतील शिक्षक आणि कर्मचार्यांची आरटीपीसीआर टेस्ट करणे शासनाने बंधनकारक केले आहे. त्यानुसार नवी मुंबई शहरातील शाळांमधील शिक्षकांनी टेस्ट केली होती. त्यामधील सुमारे 17 शिक्षकांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शालेय शिक्षण विभागाने दिवाळीनंतर म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून सुरक्षेच्या उपाययोजना आणि नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. शाळा सुरू करताना शिक्षक आणि शाळांमधील इतर कर्मचार्यांची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेने 19 ते 21 नोव्हेंबरपर्यंत शहरातील महापालिका आणि खाजगी शाळांमधील सर्वच शिक्षक आणि कर्मचार्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी मोफत करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार या तीन दिवसांत शहरातील सुमारे 1,195 शिक्षकांची चाचणी करण्यात आली होती. मुंबई शहर आणि उपनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार नवी मुंबई शहरातील सर्वच शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. शिक्षकांच्या केलेल्या आरटीपीसीआर चाचणीमध्ये तब्बल 17 शिक्षकांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai