बेलापूर मतदारसंघात मोफत फिरता दवाखाना सुरु
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 25, 2020
- 882
आ. मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश ; आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते लोकार्पण
नवी मुंबई : कोरोना काळात इतर आजारांच्या रुग्णांना दवाखान्यात जाऊन उपचार घेण्यास भिती वाटते. सर्व रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी आपल्या मतदार संघातील सर्व प्रभागात फिरता दवाखाना असावा यासाठी आ.मंदा म्हात्रे प्रयत्नशील होत्या. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून उपमुख्यमंत्री कार्यालय, नवी मुंबई महानगरपालिका व एचडीएफसी बँक यांच्या माध्यमातून मतदारसंघातील सर्व प्रभागात मोफत फिरता दवाखाना सुरु करण्यात आला आहे. सदर दवाखान्याचे लोकार्पण सोहळा नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते संपन्न झाला.
नागरिकांना घराजवळच तातडीने उपचार मिळावेत यासाठी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या सौजन्यातून उपमुख्यमंत्री कार्यालय, नवी मुंबई महानगरपालिका व एचडीएफसी बँक यांच्या माध्यमातून मतदारसंघातील सर्व प्रभागात मोफत फिरता दवाखाना उपलब्ध करण्यात आला आहे. सदर फिरता दवाखानामध्ये मोफत प्रथमोपचार, मोफत तपासणी, मोफत बी.पी.व मधुमेह तपासणी करण्यात येणार असून मोफत औषधेही वितरीत करण्यात येणार आहेत. बेलापूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरिकांना याचा लाभ घेता यावा, याकरिता बेलापूर मतदारसंघात सर्व 52 प्रभागात हा मोफत फिरता दवाखाना उपलब्ध करण्यात येणार असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, विद्यार्थी अशा सर्व स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, सध्याचे वर्ष हे कोरोनाच्या महाभयंकर महामारीने ग्रस्त आहे. नागरिकांमध्ये पसरलेल्या भीतीचे वातावरण पाहता तपासणी करण्यासही लोक घाबरत आहेत. अशा परिस्थितीत माझ्या बेलापूर मतदारसंघातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविणे हे एक लोकप्रतिनिधी म्हणून माझे प्रथम कर्तव्य आहे. नागरिकांना मोफत तसेच त्यांच्या घराशेजारी वैद्यकीय सेवा पुरविण्याच्या दृष्टीने हा मोफत फिरता दवाखाना उपलब्ध करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व नागरिकांनी या मोफत फिरता दवाखान्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.म्हात्रे यांनी केले आहे. या लोकार्पण सोहळ्याला स्थायी समिती माजी सभापती संपत शेवाळे, नगरसेवक अशोक गुरखे, सुनील पाटील, दीपक पवार, दत्ता घंगाळे, विजय घाटे, दर्शन भारद्वाज, जयवंत तांडेल, राकेश गुप्ता, समाजसेवक कौस्तुभ बुटाला, एचडीएफसी बँकेचे बिपीन हिरे, समीर ब्रीद, विनय चौधरी, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, सुजाता ढोले, उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, दादासाहेब राजळे, डॉ. कांचन मालवी तसेच असंख्य नागरिक उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai