...म्हणून स्टेशन आधीच साखळी खेचून थांबवतात गाडी
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 10, 2020
- 929
कोरोना चाचणी टाळण्यासाठी अजब शक्कल
मुंबई : मुख्य स्टेशन वर सुरू असणार्या कोरोनाची चाचणी टाळण्यासाठी रेल्वे प्रवाशांनी एक नवी शक्कल लढवली आहे. रेल्वेची साखळी खेचून गाडी स्टेशन आधीच थांबवण्याच्या प्रकारात वाढ झालेली आहे. गेल्या 10 ते 12 दिवसांत साखळी खेचण्याच्या 63 घटना घडलेल्या आहेत.
गेल्या दहा-बारा दिवसांत साखळी खेचून गाडी थांबवण्याचे प्रकार वाढले असून अशा 63 घटना उघडकीस आल्या आहेत. चार राज्यांतून रेल्वेने येणार्या प्रवाशांनाही कोरोना चाचणीचा अहवाल बाळगणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी 96 तास आधी कोरोना चाचणी किंवा राज्यातील रेल्वे स्थानकांवर उतरल्यावर प्रवाशांची तपासणी हा नियम आहे. रेल्वे आलेल्या प्रवाशांमध्ये लक्षणे आढळल्यास त्यांची चाचणी केली जाते. हे काम त्या त्या महापालिकांकडून सुरू आहे.
कोरोनाची बाधा झाल्याचे आढळल्यास प्रवाशाची कोरोना केंद्रात रवानगी करण्यात येते. मात्र ही चाचणी टाळण्यासाठी दिल्ली, गोवा, गुजरात, राजस्थान इथून मेल-एक्स्प्रेसने मुंबई महानगरातील रेल्वे स्थानकात उतरणार्या काही प्रवासी मेल-एक्स्प्रेस गाड्या संबंधित चाचणी केंद्र असलेल्या थांब्यावर न उतरता आधीच गाडी थांबवून उतरत आहेत. यासाठी गाड्यांच्या डब्यांमध्ये असलेली आपत्कालीन साखळी खेचली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यात सर्वाधिक 36 घटना पश्चिम रेल्वेवरील आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्याने दिली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai