भाजीपाल्याचे दर घसरले
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 25, 2021
- 946
नवी मुंबई : गेल्या काही दिवसात एपीएमसी बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाला आवक होत असल्याने दरात घसरण झाली आहे. महाराष्ट्र बरोबर परराज्यातून एपीएमसी दिवसाला 650 ते 700 गाड्यांची आवक होवू लागली आहे. नाशिक, नगर, सांगली, पुणे त्याचबरोबर कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश मधूनही भाजीपाला येवू लागला आहे. थंडीचा मोसम असल्याने याचा सकारात्मक परिणाम भाजीपाला उत्पादनावर झाला. त्यामुळे आवक वाढल्याने दर आता 30 ते 40 टक्के खाली आले आहेत.
एपीएमसीमधून दिवसाला 2 हजार गाड्या मुंबई, उपनगर, वसई-विरार, कल्याण डोंबिवली, पनवेल भागात पुरवला जातो. थंडीच्या दिवसात भाजीपाल्याचे उत्पादन चांगले होत असल्याने आवकही मोठ्या प्रमाणात होत आहे. बाजारात भाज्यांची आवक वाढल्याने त्याचे दर उतरले आहेत. तसेच महाराष्ट्रासह परराज्यातूनही भाज्या येत असल्याने दर आणखी खाली आले आहेत. मात्र आता या मालवाहतूक दारांनी दरवाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भाडेवाढ झाल्यास साहजिकच त्याचा भुर्दंड ग्राहकांवर बसणार आहे. किरकोळ व्यापार्यांकडून चढ्या दरात भाजीपाला, कांदा बटाटा, फळे विकली जाणार असल्याने महागाई आपोआपच वाढणार आहे.
एपीएमसी मार्केट होलसेल दर - प्रति किलो
वांगी - 8-10 रूपये किलो
कार्ली - 12-13
भेंडी - 12-14
टोमॅटो - 11-13
दोडका - 10-13
गवार - 24-25
वटाणा - 18-20
फ्लावर - 8-10
कोबी - 5-7
ढोबळी मिरची - 10-12
गाजर - 15-16
मिर्ची - 11-14
प्रति जुडी किंमत -
कोथिंबीर - 8-10
पालक - 5-6
मेथी - 6-8
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai