संचारबंदीच्या पहिल्या दिवशी 1 लाख 19 हजाराहून अधिक दंडवसूल
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 19, 2021
- 671
नवी मुंबई ः शासनाच्या निर्देशानुसार नवी मुंबईतही 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून संपूर्ण नवी मुंबई शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यास कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करून परवानगी देण्यात आली असून त्याकडे महानगरपालिकेच्या विशेष दक्षता पथकांमार्फत बारकाईने लक्ष दिले जात आहे. संचारबंदी सुरु झाल्यापासून एका दिवसात या पथकाने 183 व्यक्ती / दुकानदार यांच्यावर कोव्हीड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रु. 1 लक्ष 19 हजार 600 इतकी दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे.
यामध्ये मास्क न घालणार्या 68 व्यक्तींकडून रु. 34 हजार, सुरक्षित अंतर नियमांचे उल्लंघन करणार्या 103 व्यक्तींकडून 20 हजार 600 व सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्या 3 व्यक्तींकडून रु. 3 हजार अशाप्रकारे एकूण 183 व्यक्तींकडून रु. 1 लक्ष 19 हजार 600 इतकी दंड वसूली केलेली आहे. 20 मार्चपासून या 31 विशेष दक्षता पथकांनी 8213 व्यक्ती / व्यावसायिक यांच्याकडून 44 लक्ष 98 हजार 800 इतकी दंडात्मक रक्कम वसूल केली असून याव्यतिरिक्त प्रत्येक विभागनिहाय पोलीसांसह नेमलेली दक्षता पथके स्वतंत्ररित्या कोव्हीड नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करीत आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai