दुसर्या विशेष सत्रात 67 विद्यार्थ्यांचे लसीकरण
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 04, 2021
- 450
नवी मुंबई ः उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणार्या विद्यार्थ्यांची कोव्हीड लसीकरण न झाल्यामुळे अडचण होऊ नये व शैक्षणिक संधी वाया जाऊ नये महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली 31 मे रोजी सेक्टर 15 नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात आयोजित केलेल्या विशेष लसीकरण सत्राचा लाभ परदेशी विद्यापिठात प्रवेश मिळालेल्या 252 विद्यार्थ्यांनी घेतला होता.
तथापि या संधीपासून आणखी काही विद्यार्थी असल्यास ते वंचित राहू नये याकरिता 03 जून रोजी आयोजित केलेल्या विशेष लसीकरण सत्रात 40 युवक व 27 युवती अशा एकूण 67 विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai