घणसोलीतील 3 अनधिकृत बांधकामे निष्कासित
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 29, 2021
- 537
नवी मुंबई ः घणसोली विभाग कार्यक्षेत्रातील बाळारामवाडी, जिजामाता नगर व घणसोली गांव याठिकाणी आरसीसी जोत्याचे बांधकाम तसेच आरसीसी तळमजला कॉलमचे बांधकाम पालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे सुरू केले होते. या तिन्ही अनधिकृत बांधकामांस घणसोली विभागामार्फत नोटीसा बजाविण्यात आल्या होत्या. त्यास अनुसरून संबंधित अनधिकृत बांधकाम धारकांनी ही बांधकामे स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी ही अनधिकृत बांधकामे सुरू ठेवली होती.
या अनधिकृत बांधकामांवर घणसोली विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आले व तिन्ही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. या धडक मोहिमेसाठी घणसोली विभागातील अधिकारी / कर्मचारी, मजूर 15, ब्रेकर 4, गॅस कटर 1, जेसीबी 1 तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai