खारघर, द्रोणागिरी आणि उलवेत पाणीकपात
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 20, 2021
- 384
आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा राहणार बंद
नवी मुंबई ः सिडको महामंडळाकडून खारघर, उलवे आणि द्रोणागिरी नोडमधील पाणी पुरवठा वितरण व्यवस्था सुधारण्याकरिता हाती घेण्यात आलेल्या देखभालीच्या कामांसाठी 19 सप्टेंबर 2021 पासून काही कालावधीसाठी दर आठवड्यातील ठराविक दिवशी संबंधित नोडमधील पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार आहे.
याबाबतचे वेळापत्रक सिडकोतर्फे जाहीर करण्यात आले असून, या वेळापत्रकानुसार द्रोणागिरी व मजीप्रा (जेएनपीटी) येथे दर रविवारी सकाळी 08.00 वाजेपासून ते सोमवारी सकाळी 07.00 वाजेपर्यंत, खारघर नोडमध्ये दर सोमवारी सकाळी 08.00 ते मंगळवारी सकाळी 07.00 वाजेपर्यंत, उलवे नोडमध्ये दर मंगळवारी सकाळी 08.00 वाजेपासून ते बुधवारी सकाळी 07.00 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी व आदल्या दिवशी पुरेसा पाणी साठा करून सिडकोस सहकार्य करावे, असे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai