डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती द्या
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 28, 2021
- 428
पालिका आयुक्तांचे निर्देश
नवी मुंबई ः प्रत्येक संशयीत डेंग्यू रुग्णाच्या परिसरातील प्रतिबंधात्मक कार्यवाही अधिक प्रभावीपणे राबविण्यावर काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश देत याबाबतचे संपूर्ण अधिकार व संपूर्ण जबाबदारी संबंधीत नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी यांची आहे असे निर्देशित करीत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी डेंग्यू व मलेरिया प्रतिबंधात्मक कार्यवाही करणारे समूह अधिक कृतीशीलपणे सक्रीय करा असे आदेश दिले.
सद्यस्थितीत एमएमआर क्षेत्रातील डेंग्यू व मलेरिया रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील डेंग्यू व मलेरिया स्थितीचा बारकाईने आढावा घेण्यासाठी आयुक्तांनी आरोग्य विभागातील संबंधीत अधिकार्यांशी वेबसंवाद साधत प्रतिबिधात्मक उपाययोजना राबविण्यामध्ये अधिक क्टिव्ह होण्याचे निर्देश दिले. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे अथवा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जाणारी एकही संशयीत केस महानगरपालिकेकडून सुटता कामा नये याकडे बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. अतिरिक्त आयुक्त आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी डेंग्यू, मलेरियाच्या दृष्टीने हॉटस्पॉट वाटतात अशा भागांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील स्थितीची व त्याठिकाणी राबविण्यात येणा-या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची बारकाईने पाहणी करावी असेही आयुक्तांनी सूचित केले.
डेंग्यू व मलेरियाच्या हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये तपासणी व प्रतिबंधात्मक कार्यवाहीकरिता प्रवेश नाकारणार्या सोसायट्यांकडून 50 हजार रक्कमेपर्यंत दंड आकारला जाईल असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या संशयीत डेंग्यू रुग्णांवरील उपचारांबाबत बारकाईने आढावा घेताना आवश्यक औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून ठेवणेबाबत आयुक्तांनी निर्देश दिले. तसेच वाशी रूग्णालयात आवश्यतेनुसार रूग्णखाटांची संख्या वाढविण्यात यावी असे निर्देश देण्यात आले. ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रूग्णालयात ऐरोली, दिघा परिसरातील उपचारासाठी येणार्या रूग्णांची जास्त संख्या लक्षात घेता ऐरोली रूग्णालयातही डेंग्युचा विशेष कक्ष तात्काळ सुरू करणेबाबत निर्देश देण्यात आले. रूग्णखाटांचे नियोजन करताना कोणत्याही परिस्थितीत रुग्ण उपचारासाठी इतर रुग्णालयात संदर्भित होणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेण्याचे सूचित करण्यात आले. काही रुग्णांना प्लेटलेट्सची गरज भासते त्याची उपलब्धता महानगरपालिकेमार्फत विनामूल्य करण्यात यावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai