फूटपाथ कोसळून तरुण जखमी
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 11, 2021
- 570
नवी मुंबई : वाशीतील फूटपाथ कोसळून दोन तरुण 10 फुट खोल नाल्यात पडून जखमी झाले आहेत. तरुणासह दोन स्कूटी नाल्यात पडल्या. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.
वाशी सेक्टर 19 येथील 20 मीटर लांब फुटपाथ तब्बल 10 फूट खाली कोसळल्याने एक मोठा अपघात झाला. रात्री अचानकपणे इतका मोठा फुटपाथ कोसळला. या फुटपाथवरून चालत असलेला एक तरुण आणि फुटपाथवर असलेल्या 2 स्कुटी नाल्यात पडल्या. यामध्ये तरुण जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 2 स्कुटीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. इतका मोठा फुटपाथ क्षणात कोसळल्याने हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे कामकाज झाले असल्यानेच ही दुर्घटना घडली असून स्थानिक नागरिकांकडून महापालिका प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai