कंत्राटी कर्मचार्यांना 28 ऑक्टोबरपुर्वी मिळणार बोनस
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 26, 2021
- 765
नवी मंबई ः दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारीवृंदास दिवाळीपूर्वीच सानुग्रह अनुदान तसेच ऑक्टोबर महिन्याचे वेतन अदा करणेबाबत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व विभागप्रमुख व कार्यालय प्रमुख यांस निर्देश दिले आहेत. त्यासोबतच महानगरपालिकेच्या विविध विभागांत कार्यरत कंत्राटी कामगार तसेच ठेकेदाराकडील कर्मचारी यांचीही दिवाळी आनंदात जावी यादृष्टीने आयुक्तांनी सन 2020-21 या आर्थिक वर्षाकरिता विहित मुदतीत बोनस व रजा रोखीकरण रक्कम तसेच ऑक्टोबर महिन्याचे मासिक वेतन 28 ऑक्टोबरपूर्वी अदा करणेबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. सदर आदेशान्वये सर्व कंत्राटी कामगार व ठेकेदाराकडील कर्मचार्यांना 2 नोव्हेंबरपासून सुरू होणार्या दिवाळीआधीच बोनस व रजा रोखीकरण रक्कम तसेच ऑक्टोबर महिन्याचे मासिक वेतन मिळणार असल्याने त्यांच्यामार्फत आनंद व्यक्त केला जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai