बाळविक्री प्रकरणाचा पोलीसांनी केला पर्दाफाश
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 02, 2021
- 409
आरोपींना पोलीस कोठडी ; बाळाच्या आईला 95 हजार तर मध्यस्थ डॉक्टरला दोन लाख
पनवेल : अडीच महिन्यांच्या बाळाची बेकायदेशीर विक्रि करणार्या कामोठेतील डॉक्टरसह चार साथीदारांना पोलीसांनी गजाआड केले आहे. बाळ विक्रिप्रकरणी चार लाखांचा सौदा ठरला होता. त्यातील 95 हजार बाळाच्या आईला व दोन लाख मध्यस्थ डॉक्टरला मिळणार होते. पोलीसांनी बनावट पालकांच्या साहाय्याने हा डाव हाणून पाडला असून बाळाला आईच्या स्वाधीन केले आहे.
मुंबई येथील नालासोपारा येथून तळोजा वसाहतीमध्ये राहण्यासाठी आलेल्या 28 वर्षीय एका महिलेला पाच मुले आहेत. दोन मोठी मुले भायखळा येथील मदरशामध्ये असून तिच्यासोबत दोन मुली आणि एक मुलगा तळोजात राहतात. अडीच महिन्यांची आणखी एक मुलगी तिला नुकतीच झाली होती. संबंधित महिलेचा पती तिच्यासोबत राहत नसल्याने ती आर्थिक विवंचनेत होती. कामोठे पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश महाला यांच्या पथकाने हे प्रकरण उघडकीस आणले. कामोठे येथील सेक्टर 8 मध्ये ‘फॅमिली हेल्थ केअर’ या नावाने डॉक्टर पंकज पाटील हे परिसरात सराव करतात. यांच्याकडे एका बाळाची विक्री होत असल्याची माहिती पोलीस अधिकारी महाला यांना समजल्यावर त्यांनी राजस्थानी पालकाचा बनाव करून एक कुटुंब डॉक्टर पाटील यांच्याकडे पाठविले. डॉ. पाटील यांच्यासोबत बनावट पालकांचे झालेल्या संवादाची पोलिसांनी खात्री पटल्यानंतर बाळ खरेदीसाठी चार लाख रुपयांची रक्कम ठरविण्यात आली. पोलिसांनी रकमेची तरतूद केली. या रकमेच्या बंडलांमध्ये काही बनावट नोटांचा वापर करण्यात आला. अखेर ठरल्याप्रमाणे रक्कम स्वीकारल्यानंतर पोलिसांनी या चौकडीला अटक केली. चार लाखांच्या विक्रीमध्ये बाळाच्या आईला 95 हजार मिळणार होते. तसेच बाळाची खरेदी विक्री करण्यासाठी पोलिसांनी बनावट एजंट नेमलेल्या व्यक्तीला 20 हजार रुपये आणि अटकेत असणार्या रुखसार नदीन शेख (29) आणि रजनी पांडुरंग जाधव (32) यांना प्रत्येकी 40 हजार रुपये मिळणार होते.
सध्या या प्रकरणातील पीडित अडीच महिन्यांचे बाळ त्याच्या आईसोबत आहे. कामोठे पोलिसांनी या बाळाच्या ताब्याविषयी बालक कल्याणकारी विभागाकडे मार्गदर्शन मागीतले होते. या विभागाने बाळ हे आईच्या दुधावरच असल्याने त्याला आईसोबत ठेवण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. बालक दत्तक योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये सरकारी पद्धत न अवलंब करता थेट विकणारे व खरेदी करणारे पालक असा रोख्यांच्या व्यवहार झाल्याने अनेक वर्षांंचे वैद्यकीय शिक्षण घेऊन दवाखाना नावारूपाला आणणारे डॉक्टर पाटील हे कोठडीत मी यापूर्वी असे कधीच केले नसल्याचा पश्चात्ताप व्यक्त करत असल्याची माहिती कामोठे पोलिसांनी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai