पनवेल एसटी स्थानकात पोलीस चौकी उभारा
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 11, 2021
- 588
पनवेल : पनवेल एसटी स्थानकात कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्याची मागणी भाजपच्या ओबीसी सेलचे उपाध्यक्ष नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र देऊन केली आहे.
पनवेल हे मुंबईचे प्रवेशद्वार समजले जाते. मुंबई, ठाणे, कल्याण आदींसह घाटमाथा, कोकणात जाणार्या प्रवाशांची मोठी वर्दळ या ठिकाणी असते. अनेक वेळा गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमार प्रवाशांचे पाकीट, मोबाईल व महिलांचे दागिने खेचून नेत असतात. पनवेल स्थानकात यापूर्वी पोलीस चौकी होती, पण ती एका बाजूला असल्याने गुन्हेगारांवर वचक बसण्यासाठी त्याचा उपयोग होत नव्हता. सध्या त्या ठिकाणी चौकीच नाही. त्यामुळे नगरसेवक मनोज भुजबळ यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना व पनवेल शहर पोलीस निरीक्षकांना पत्र देऊन पनवेल एसटी स्थानकात कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्याची मागणी केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai