विविध विकास कामांचे भूमिपूजन
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 26, 2021
- 1104
नवी मुंबई ः ऐरोली विधानसभा व बेलापूर विधानसभा मतदार संघात ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांच्या सततच्या प्रयत्नाने साकारलेल्या कामांची शुक्रवारी पाहणी व भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या पाहणीची सुरुवात नवी मुंबई शहराच्या प्रवेशद्वाराजवळून म्हणजे पटणी व बेलापूर रोड वरील दिघा चौकातून करण्यात आली.
नवी मुंबई शहरात विकास कामांचा पाठपुरावा खासदार राजन विचारे गेली 2 वर्षापासून करीत आहेत. त्यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या चौकांच्या सुशोभीकरणाच्या कामांची पाहणी व भूमिपूजन सोहळा 26 नोव्हेंबरला करण्यात आला. यावेळी दिघा मैदानात येथील संत निरंकारी मंडळामार्फत दरवर्षी समागम या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यासाठी महाराष्ट्र राज्याबरोबर इतर राज्यातील नागरिक याठीकाणी येत असतात. म्हणून या चौकात एन आकाराची प्रतिकृती दाखविण्यात आली आहे. या कामाचे भूमिपूजन खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आले. ऐरोली दिवा गाव येथे स्कल्पचर उभे करून या परिसरात शोभिवंत झाडे लावून सुशोभीकरण करण्यात येणार्या कामाचे भूमिपूजन, घणसोली प्रभाग क्रमांक 35 सेक्टर 8 मधील टेंम्पटेशन चौकात अत्याधुनिक पद्धतीचे कारंजे उभारण्याच्या कामाचे भुमीपुजन खा. विचारे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ऐरोली सेक्टर 3 राजीव गांधी मैदानाच्या विकासासाठी क्रिकेट, बॅडमिंटन, हॉलीबॉल पीच विकसित करून प्रेक्षक गॅलरी विकसित करण्याचे काम सुरु असल्याने त्याची पाहणी करण्यात आली. गवळीदेव व सुलाईदेवी या डोंगर पायथ्याशी प्रवेशद्वाराचे काम सुरू केले असून 2-दीपस्तंभ व मिरर वॉलच्या कामाची, बेलापूर येथील सेक्टर 11 येथील कोकण भवन समोरील चौकाचे सुशोभिकरणाच्या कामाची, बेलापूर येथील सेक्टर 2 छत्रपती शिवाजी महाराज सर्कल सुनील गावस्कर मैदाना समोरील चौकात घोड्यांची प्रतिकृती उभारण्यात येत असलेल्या या कामाची, बेलापूर एअर इंडिया कॉलनी व अपोलो हॉस्पिटल समोरील आम्र मार्ग चौकाचे सुशोभीकरण सुरु झालेल्या कामाची, नेरूळ सेक्टर 42 सावला हॉस्पिटल समोरील चौकात अत्याधुनिक पद्धतीचे कारंजे बसवून परिसर सुशोभिकरण करण्यात येणार आहे त्या जागेची पाहणी करण्यात आली. सानपाडा येथे झाशीची राणी मैदानात कबड्डी साठी ग्राउंड, हॉलीबॉल पीच नेट प्रॅक्टिससाठी, क्रिकेट पिच, फुटबॉल पीच, शौचालयाची सुविधा अशा एक अनेक सुविधा या मैदानामध्ये देऊन नागरिकांना उत्तम असे खेळाचे मैदान विकसित करण्यात येणार आहे याची पाहणी खासदार राजन विचारे यांनी केली.
यावेळी ऐरोली विधानसभेचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, बेलापुर विधानसभेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, नगरसेवक एम के मढवी, करण मढवी, संजू वाडे, नंदा काटे, नवीन गवते, राजेश गवते, दीपा गवते, अपर्णा गवते, जगदीश गवते, शुभांगी गवते, रवी पाटील, मिलिंद पाटील, नवी मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता संजय पाटील, गुमस्ते, मदन वाघचौरे, अजय संखे, मनोज पाटील व इतर शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai