गोरेगाव ते पनवेल लोकल सुरु
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 01, 2021
- 571
मुंबई : गोरेगाव ते पनवेल थेट लोकल सेवा आजपासून सुरू झाली आहे. दिवसभरात एकूण 18 फेर्या होणार आहेत. त्यामुळे हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. पनवेल ते अंधेरी सेवेचा विस्तार गोरेगावपर्यंत करण्यात आला आहे. 1 डिसेंबरपासून अंधेरी-पनवेले-अंधेरी अशा 18 फेर्या गोरेगाव-पनवेल-गोरेगाव अशा होणार आहेत.
गोरेगावकडून थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पनवेलला जाण्याचा प्रवास करणे सोपे झाले आहे. आता गोरेगाव ते पनवेल आणि गोरेगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी लोकल रेल्वेच्या फेर्या वाढविण्यात आल्या आहेत. दरम्यान, पश्चिम लाईनच्या प्रवाशांना पनवेल जाण्यासाठी वडाळा किंवा अंधेरी किंवा कुर्ला येथे रेल्वे बदलण्याची गरज राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाण्यासाठीही गाड्या बदलण्याची गरज आता भासणार नाही. गोरेगाववरुन दादर किंवा अंधेरीला रेल्वे बदलावी लागत होती. दरम्यान सीएसएमटी आणि गोरेगावच्य दरम्यान रेल्वेच्या 42 फेर्या होत आहेत. आता त्याचा विस्तार करत त्यांना गोरेगावपर्यंत वाढविण्यात आले आहे. याशिवाय सीएसएमटी आणि बांद्रापर्यत धावणार्या दोन गाड्यांचा प्रवास गोरेगावपर्यंत करण्यात आला आहे. पश्चिम-मध्य आणि पश्चिम-हार्बर मार्गांच्या थेट कनेक्टिव्हिटीमुळे प्रवाशांना आराम मिळणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai