अभय योजनेला 31 जानेवारी 2022 पर्यंत मुदतवाढ
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 01, 2021
- 493
नवी मुंबई ः कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकर नागरिकांना दिलासा मिळावा यादृष्टीने 01 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत मालमत्ता कर अभय योजना जाहीर करण्यात आली होती. सदर योजनेची मुदत वाढविणेबाबत विविध माध्यमातून करण्यात आलेल्या विनंतीच्या अनुषंगाने मालमत्ता कर अभय योजनेस 2 महिने म्हणजेच 31 जानेवारी 2022 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.
मालमत्ताकर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असून दि. 01 ऑक्टोबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 या दोन महिन्यांच्या कालावधीकरीता थकीत मालमत्ता कराच्या दंडात्मक रक्कमेवर 75% पर्यंत सूट देणारी थकबाकीदारांसाठी लाभदायी अभय योजना जाहीर करण्यात आली होती. या अभय योजनेस अजून थोडा कालावधी वाढवून मिळावा अशा प्रकारच्या विनंती / सूचना विविध माध्यमांतून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे करण्यात येत होत्या. त्यास अनुसरून ही 2 महिन्यांची म्हणजेच 31 जानेवारी 2022 पर्यंत अंतिम मुदतवाढ जाहीर करण्यात आलेली आहे. आता 31 जानेवारी 2022 पर्यंत थकबाकीदार नागरिकांनी मालमत्ता कराची संपूर्ण थकित रक्कम अधिक 25% दंडात्मक रक्कम भरणा केल्यास त्यांच्या दंडात्मक रक्कमेवर 75% सूट मिळणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai