दुचाकी नोंदणीसाठी नविन मालिका सुरु
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 16, 2021
- 751
नवी मुंबई : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल कार्यालयामध्ये दुचाकी मोटार वाहनांच्या नवीन नोंदणीसाठी MH46CD ही नवीन मालिका लवकरच सुरु होत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल यांनी कळविले आहे.
नवेल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील उरण, पनवेल, कर्जत व खालापूर तालुक्यातील नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, ज्यांना आपल्या नवीन वाहनासाठी MH46CD या मालिकेतील महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 57अ अन्वये आकर्षक/अनाकर्षक नोंदणी क्रमांक राखीव करावयाचे असतील त्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल या कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 या वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे यांनी केले आहे.एकाच नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्जदारांनी अर्ज केल्यास तरतूदीनुसार नोंदणी क्रमांकासाठी जाहीर लिलाव केला जाईल.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai