15 मे पर्यंत निवडणुक कार्यक्रम पुर्ण करा
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 25, 2021
- 374
नवी मुंबई ः कोरोनामुळे लांबणीवर पडलेला नवी मुंबई महापालिकेचा निवडणुक कार्यक्रम 15 मे 2022 पर्यंत पुर्ण करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य निवडणुक आयोगाला बुधवारी केली. 17 मे 2020 रोजी पालिकेचा कार्यकाळ संपुष्टात आला. सध्या प्रशासकामार्फत येथील कारभार सुरु आहे. गेल्या दिड वर्षापासून कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर पडली आहे. आता पालिकेचा निवडणुक कार्यक्रम हाती घेतला आहे. जानेवारी अखेरपर्यंत प्रभागांची फेररचना करण्याचे काम पुर्ण होईल. त्यानंतर मेच्या अखेरीस नवी मुंबईचा निवडणुक कार्यक्रम पुर्ण होईल अशी माहिती राज्य निवडणुक आयोगामार्फत अॅड सचिंद्र शेट्ये यांनी न्या. अमजद सय्यद व न्या. अभय आहुजा यांच्या खंडपीठाला बुधवारी दिली. मात्र न्यायालयाने 15 मे 2022 पर्यंत निवडणुक कार्यक्रम पुर्ण करण्याची सूचना निवडणुक आयोगाला करत याचिका आयोगाला करत याचिका निकाली काढली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai