31 डिसेंबरला 4 लक्ष 70 हजार रक्कमेची दंड वसूली
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 04, 2022
- 637
नवी मुंबई ः 31 डिसेंबर आणि नववर्ष स्वागताच्या अनुषंगाने विभाग कार्यालय स्तरावरील दक्षता पथके तसेच मुख्यालय स्तरावरील विशेष दक्षता पथकांमार्फत कोव्हीड नियमांच्या पालनाबाबत बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. ज्याठिकाणी कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमावलीचे उल्लंघन होताना आढळले त्याठिकाणी दंडात्मक कारवाई करून एकूण 4 लक्ष 70 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.
सेक्टर 40, नेरूळ येथील सीवूड वाईन्स आणि सेक्टर 10 वाशी येथील संजय लंच होम यांचेकडून प्रत्येकी रू. 10 हजार याप्रमाणे दंड वसूल करण्यात आलेला आहे. तसेच आपल्या रेस्टॉरंट, बारच्या 50 टक्के क्षमतेपेक्षा अधिक गर्दी असलेल्या 9 ठिकाणी म्हणजेच सेक्टर 3 ऐरोली येथील हॉटेल साईप्रकाश, सेक्टर 2 ऐरोली येथील प्रियंका हॉटेल, सानपाडा रेल्वे स्टेशनजवळील रसोई रेस्टॉरंट अँड बार तसेच शालीन रेस्टॉरंट, एपीएमसी मार्केट तुर्भे जवळील विसावा हॉटेल, पामबीच गॅलरिया येथील एजंट जॅक्स बार, बेलापूर येथील फ्लेमिंगो रेस्टरंट, सेक्टर 7 कोपरखैरणे येथील लक्ष्मी हॉटेल व सेक्टर 14 कोपरखैरणे येथील न्यू पंचरत्न हॉटेल यांच्याकडून कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्यापोटी प्रत्येकी 50 हजार प्रमाणे दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. नवी मुंबईकर नागरिकांनी व विविध आस्थापनांनी कोव्हीड नियमांचे उल्लंघन करून कोव्हीड प्रसाराचे कारण बनू नये याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सतत आवाहन केले जात असून प्रत्येक आस्थापनेने मास्क नाही व लसीकरण नाही तर प्रवेश नाही हे ध्यानात घेऊन कोव्हीड नियमावलीचे पालन करावे आणि दंडात्मक कटू कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नये असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai