जागतिक कर्करोग दिनानिमित्त पोस्टर स्पर्धा
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 02, 2022
- 364
नवी मुंबई ः कर्करोग या आजारामुळे जगात प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर जिवितहानी होताना दिसते. कर्करोगाविषयी मोठ्या प्रमाणावर जागरुकता निर्माण व्हावी याकरिता नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.असाच एक उपक्रम 4 फेब्रुवारी या जागतिक कर्करोग दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असून या अंतर्गत लोकसहभागातून कर्करोगाविषयी जनजागृती व्हावी याकरिता पोस्टर डिझाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
युवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर कल्पक दृष्टी असते. या नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर कर्करोगाविषयी जनजागृतीत व्हावा ही भूमिका नजरेसमोर ठेवून 15 ते 25 वर्षे वयोगटातील युवकांसाठी महानगरपालिकेने पोस्टर डिझाईन स्पर्धा आयोजित केली आहे. याकरिता युवकांनी ए थ्री आकाराच्या कोर्या कागदावर उभ्या किंवा आडव्या स्वरुपात मराठी, इंग्रजी भाषेतील कलात्मक पोस्टर 300 पीपीआय रिझॉल्युशनमध्ये र्पींलवलपिााल1सारळश्र.लेा या इमेल आयडीवर 3 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत पाठवावयाचे आहे.
पोस्टर डिझाईन पाठविताना फाईल नेमच्या ठिकाणी स्पर्धकाने आपले पूर्ण नाव ठेवावयाचे आहे. सदर स्पर्धेतील उल्लेखनीय पोस्टर डिझाईनला आकर्षक पारितोषिके दिली जाणार असून डिझाईनचे सर्व हक्क नवी मुंबई महानगरपालिकेकडे असणार आहेत. तर इंग्रजी डिझाईन अंतिम निवडीत असल्यास त्यांस मराठी रूपांतरित डिझाईन देणे अनिवार्य राहील. ई मेलव्दारे ऑनलाईन डिझाईन पाठविण्याऐवजी डिझाईन प्रिंट केलेली प्रत पाठवावयाची असल्यास ती नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, आरोग्य विभागाकडे दि. 3 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जमा करावी.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai