पालिकेची विशेष मिशन इंद्रधनुष्य 4.0 मोहिम
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 07, 2022
- 570
नवी मुंबी ः केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात ‘विशेष मिशन इंद्रधनुष 4.0’ मोहिमेचे नियोजन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले असून 3 महिन्यांमध्ये राबविण्यात येणार्या या मोहिमेच्या पहिल्या महिन्यातील लसीकरणाला 7 मार्च 2022 पासून प्रारंभ केला जाणार आहे.
प्रत्येक महिन्यात 7 दिवस ही मोहीम 23 नागरी आरोग्य केंद्रांमार्फत त्यांच्या क्षेत्रात राबविली जाणार असून पहिल्या महिन्यात 7 मार्च, दुसर्या महिन्यात 4 एप्रिल व तिसर्या महिन्यात 9 मे 2022 पासून पुढील 7 दिवसांकरिता ही मोहीम रविवार, शासकीय सुट्टी आणि नियमित लसीकरणाचे दिवस वगळून राबविण्यात येणार आहे. यापूर्वीही मिशन इंद्रधनुष्यच्या तिन्ही मोहिमा नवी मुंबई महानगरपालिकेने यशस्विरित्या राबविलेल्या असून या चौथ्या मोहिमेतील उद्दिष्टपूर्तीसाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आलेले आहे. या ‘विशेष मिशन इंद्रधनुष 4.0’ मोहिमेअंतर्गत 0 ते 23 महिने वयाच्या सर्व लाभार्थी बालकांना म्हणजेच मार्च 2020 मध्ये किंवा त्यानंतर जन्म झालेल्या बालकांचे लसीकरण करण्यात येणार असून गर्भवती महिला यांचेही लसीकरण करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी, एएनएम, एएचव्ही, आशा स्वयंसेविका या सर्व घटकांना प्रशिक्षण सत्रे आयोजित करून आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले असून याची बॅनर्स, होर्डींग याव्दारे व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आलेली आहे. बालकांमधील मृत्यू व आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी साधन आहे. त्यामुळे या मोहिमेमध्ये लसीकरणापासून वंचित राहिलेल्या किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवण्यात आलेले आहे. विशेष मिशन इंद्रधनुष 4.0 मोहिमे अंतर्गत नमुंमपा कार्यक्षेत्रात 45 बाह्यसंपर्क सत्रे आणि 06 मोबाईल सत्रे अशी एकूण 51 सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. या सत्रांव्दारे एकूण 290 गरोदर माता व 1312 बालके अशा एकूण 1602 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. महानगरपालिकेमार्फत विशेष बाब म्हणून प्रत्येक बालकाचे लसीकरण होण्याच्या दृष्टीने बालकाला / मातेला लसीकरणाच्या आदल्या दिवशी भेट देऊन लसीकरण करण्याविषयी आवाहन केले जाणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai