वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पोलीस उपनिरीक्षक बेपत्ता
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 08, 2022
- 522
नवी मुंबई : कळंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनेष बच्छाव गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहेत. बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक संजय पाटील यांच्या वागणूकीवर आणि भ्रष्टाचारावर बोट ठेवले आहे. शिवाय वरिष्ठ अधिकार्यांच्या जाचाला कंटाळून आपण जीवाचे बरेवाईट करू शकतो, असा पत्रात उल्लेख केला आहे. त्यामुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे.
अनेक वेळा आपण चांगले काम करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, परिष्ठ अधिकारी संजय पाटील यांनी खोडा घालून आपले मानसिक संतूलन बिघडवलेले आहे. त्यामुळे मला जीवन जगण्यात रस नसल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. याबरोबरच आपण पारदर्शक काम करत आहे. परंतु, माझी बदनामी करून बदली करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, पोलीस उपनिरीक्ष मनेश बच्छाव हे शनिवारी दुपारपासून बेपत्ता आहेत. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मनेष बच्छाव यांचा पत्ता नसल्याने मिसींग तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी वरिष्ठांना विचारले असता कोणीही प्रतिसाद दिलेला नाही. नवी मुंबई पोलीस खात्यात बदल्यांमध्ये आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असल्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. दरम्यान, याबाबत आयुक्त बिपीनकुमार सिंग यांच्याकडून काहीच पावले उचलली जात नसल्याने या प्रकाराला त्यांची मूक संमती आहे का? असा प्रश्न पोलीस कर्मचारी खासगीत विचारत आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai