मनसेचे ढोल वाजवा आंदोलन
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 08, 2022
- 612
कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 11 मार्चला धडक मोर्चा
नवी मुंबई ः मनपा कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी 11 मार्च 2022 रोजी सकाळी 11 वाजता मनसे मनपा कामगार कर्मचारी सेने तर्फे मनपा मुख्यालयावर ढोल वाजवत धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. मनसे मनपा कामगार कर्मचारी सेनेचे राज्य अध्यक्ष व मनसे सरचिटणीस, प्रवक्ते संदीप देशपांडे आणि मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली हा धडक मोर्चा नवी मुंबई मनसे युनियन कार्यालय, सीवूड्स ते मनपा मुख्यालय असा होणार आहे.
मनसे युनियन ने ‘कायम’ कामगारांप्रमाणे, कंत्राटी कामगारांना देखील समान काम समान वेतन लागू करण्यासाठी 09 एप्रिल 2021 रोजी मागणी केली. त्यावर अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली, परंतु त्यात एकाही कामगार संघटनेच्या प्रतिनिधीला समाविष्ट करण्यात आले नाही. यामध्ये कोणताही धोरणात्मक निर्णय न घेता, हा निव्वळ वेळ काढूपणा करण्याचे काम पालिका प्रशासनामार्फत चालू आहे. तसेच कोरोना मुळे मृत्यू झालेल्या कंत्राटी कामगारांच्या कुटुंबियांना 28 जुलै 2021 रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर क वर्ग महापालिकेतील कामगारांसाठी 50 लाख रुपये व नवी मुंबई महापालिकेने मंजूर केलेले 5 लाख रुपये अद्यापही देण्यात आलेले नाहीत किंवा त्याबाबतचा प्रस्तावही मनपाने शासनाकडे पाठवलेला नाही. कोरोना काळामध्ये कर्तव्य बजावणार्या मनपा कंत्राटी कामगारांना 23 मार्च 2020 ते 31 मे 2020 या कालावधीमध्ये कोरोना भत्ता प्रतिदिन 300 रुपये मिळावा अशी मागणी केली असताना देखील एका बाजूला कायम कामगारांना हा भत्ता देण्यात आला आहे मात्र कंत्राटी कामगारांच्या बाबतीत हा दूजाभाव आयुक्त करत असल्याचा आरोप मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
या मागण्यांबद्दल नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे वारंवार निवेदने करूनही प्रत्यक्षात मात्र याची अंमलबजवाणी होत नसल्यामुळे मनसे ढोल वाजवत हा धडक मोर्चा काढणार आहे. जर या मोर्चा नंतर देखील प्रशासनाला जाग आली नाही, तर कोरोना मुळे मृत पावलेल्या कंत्राटी कामगारांच्या कुटुंबीयांसमवेत आयुक्त अभिजित बांगर यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा गजानन काळे यांनी दिला. या पत्रकार परिषदेत मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे, मनसे मनपा कामगार कर्मचारी सेना शहर अध्यक्ष अप्पासाहेब कोठूळे, कार्याध्यक्ष अमोल आयवळे, सरचिटणीस अभिजित देसाई, उपाध्यक्ष रुपेश कदम, चिटणीस अशोक पाटील, सहचिटणीस रणजित सुतार व विजय राठोड उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai