जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विविध उपक्रम
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 23, 2022
- 540
नवी मुंबई ः सन 2025 पर्यंत भारत देशातून क्षयरोग दुरीकरणाचे ध्येय पंतप्रधानांनी निश्चित केले असून त्यादृष्टीने 3 उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. सन 2015 च्या तुलनेत क्षयरोगाच्या प्रमाणात 80 टक्के घट करणे, सन 2015 च्या तुलनेत क्षयरोगामुळे होणार्या मृत्यूच्या प्रमाणात 90 टक्के घट करणे तसेच क्षयरोग उपचारासाठी निरंक खर्च अशा 3 उद्दिष्टांचा समावेश आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी केंद्र शासनामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत.
प्रत्येक वर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. या वर्षीच्या जागतिक क्षयरोग दिनानिमित्त शासनाने निर्देशित केल्यानुसार 24 फेब्रुवारी ते 30 मार्च या साधारणत: महिनाभराच्या कालावधीत विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये महानगरपालिका कार्यक्षेत्रात दर रविवारी प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शालेय स्तरावर चित्रकला व निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, जनजागृतीपर रॅली, टीबी मुक्त देशाची शपथ असे विविध प्रकारचे कार्यक्रम करण्यात येत आहेत. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 6 मार्च रोजी क्षेत्रीय कर्मचा-यांमार्फत विशेष सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम राबवून 703 महिलांची तपासणी करण्यात आली आहे व क्षयरोग विषयक जनजागृतीही करण्यात आलेली आहे. जागतिक क्षयरोग दिनांच्या अनुषंगाने तेरणा वैदयकिय महाविदयालय व डॉ. डि.वाय.पाटील वैदयकिय महाविदयालय अंतर्गत पोस्टर्स स्पर्धा, चर्चासत्र, पथनाटय, रुग्णांचे आरोग्य शिक्षण अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. इंटर स्कुल एन्गेजमेंट अंतर्गत इंडस्ट्रीज असोसिएशन येथे माहिती देऊन जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच कॉर्पोरेट टीबी प्लेज या उपक्रमाकरिता एमआयडीसी क्षेत्रातील उद्योग, मॉल्स, पेट्रोल पंप, बँक, पोलीस स्टेशन, बिल्डर्स असोसिएशन यांचा राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रंमात अंतर्भाव करण्यात येणार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेमार्फत यावर्षी - खर्पींशीीं ींे एपव ढइ. डर्रींशी ङर्ळींशी - टीबी संपविण्यासाठी ‘गुंतवणूक करा व जीव वाचवा’ हे घोषवाक्य प्रसारित करण्यात आले असून याव्दारे क्षयरोग निर्मुलनाबाबतच्या विविध बाबींवर लक्ष वेधून घेतले जाणार आहे. क्षयरोगाचे निर्मूलन करताना सर्वच घटकांचे अत्यंत महत्वाचे असे सहकार्य मिळणे गरजेचे असून शासकीय व खाजगी आरोग्य सेवा यांनी एकत्रित काम करणे महत्वाचे आहे. याकरिता खाजगी क्षेत्रातील सर्व रुग्णालये, क्लिनिक, लॅब्स यांनी त्यांच्याकडे उपचार घेत असलेल्या क्षयरुग्णांची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेस कळविणे बंधनकारक आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai