ठाकूर यांचे भूखंड वाटप रद्द
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 28, 2022
- 619
नगरविकास विभागाचे सिडकोला आदेश ; आ. प्रशांत ठाकूर यांना धक्का
पनवेल ः भूखंड वाटपात अनियमितता झाल्याचा ठपका ठेवून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पत्नीच्या नावे वाटप केलेला भुखंड रद्द करण्याचे आदेश नगरविकास विभागाने सिडकोला दिले आहेत. 35780 चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंडाची किमंत 300 कोटींहून अधिक असल्याचे बोलले जात आहे. शासनाचा हा निर्णय भाजपला मोठा धक्का असल्याचे बोलले जाते.
आमदार प्रशांत ठाकूर सिडकोचे अध्यक्ष असताना 2019 मध्ये पत्नीच्या नावे हे भुखंड वाटप करण्यात आले. सिडकोने वर्षा ठाकूर यांची जासई येथील असलेली जमीन संपादित करुन त्याबदल्यात साडेबावीस योजनेंतर्गत उलवे येथे मोक्याच्या ठिकाणी 35780 चौ.मी. क्षेत्रफळाचे भूखंड वाटप सिडकोने केले. परंतु यात अनियमितता झाल्याची तक्रार नगरविकास विभागाला प्राप्त झाली होती. यासंदर्भात सिडकोकडून प्राप्त झालेला अहवाल आणि इतर बाबींची शहानिशा केल्यानंतर या भूखंड वाटपात अनियमितता झाल्याचा निष्कर्ष नगरविकास विभागाने नोंदविला आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पत्नी वर्षा ठाकूर यांना त्यांच्या जासई येथील संपादित जागेच्या बदल्यात मोबदला म्हणून उलवे येथील सेक्टर 29 मध्ये भूखंड इरादीत करण्यात आला होता. परंतु भूधारक अर्थात वर्षा ठाकूर यांनी हा भूखंड घेण्यास नकार दिला. त्यामुळए कोणतेही सबळ कारण नसताना सिडकोने पुर्वी इरादीत केलेला भुखंड रद्द करुन त्यांना उलवे पुष्पकनगरमधील सेक्टर 26 मध्ये नव्याने भुखंडाचे वाटप केले. प्रचलित कार्यपद्धतीनुसार संचालक मंडळाच्या बैठकीत भूखंड वाटपाची सोडत काढणे गरजेचे असते. परंतु तसे न करता सदर भुखंड वाटपाची सोडत व्यवस्थापकीय संचालक व सह व्यवस्थापकीय संचालक यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. मुळात ही संपुर्ण प्रक्रिया बेकायदेशीर आणि सिडकोच्या भुखंड वाटप धोरणाला छेद देणारी असून प्रक्रियेत पारदर्शकता राहिली नसल्याचा ठपका नगरविकास विभागाने ठेवला आहे. विशेष म्हणजे पुष्पकनगर येथे वाटप करण्यात आलेले क्षेत्र न्यायप्रविष्ट असून तीचा ताबा सिडकोकडे आलेला नाही. या सर्व बाबींची दखल घेऊन नगरविकास विभागाने सदर भूंखंड वाटप रद्द करण्याचे आदेश सिडकोला दिले आहेत. राज्यभरात भाजपच्यावतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट करुन ईडीची सीडी चढल्याची चर्चा असताना आता भाजपलाच पनवेलमध्ये धक्का दिल्याचे बोलले जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai