भिवंडीवाला ट्रस्टच्या जमिनीचे व्यवहार वादात
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 09, 2022
- 575
गैरव्यवहार प्रकरणी पोलीसांत गुन्हा दाखल
उरण ः खान बहादूर होरमसजी मानेकजी भिवंडीवाला ट्रस्टच्या जमिनीचे व्यवहार आता वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. त्यामुळे ही जमिन खरेदी करणारे भाजपाचे उरण येथील आमदार महेश बालदी हे देखील अडचणीत आले आहेत. बनावट दस्तऐवज तयार करून ट्रस्टमधील काही सदस्यांनी ट्रस्टचे नाव जमिनीच्या नोंदीवरून काढून टाकले. तसेच ही जमीन परस्पर विकली. यापैकी 22 एकर जमीन बालदी यांनी खरेदी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ट्रस्टचे सुमारे 80 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
ट्रस्टच्या सदस्याकडूनच उरणचे भाजप आमदार महेश बालदी यांनी सुमारे 22 एकर जमीन खरेदी केल्याने त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. या जमीन गैरव्यवहारप्रकरणी मुंबईतील एल.टी. मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भिवंडीवाला ट्रस्टची शेकडो एकर जागा नवी मुंबई परिसरात आहे. यापैकी बहुतेक जागा ही सिडकोच्या कार्यक्षेत्रात येते. ट्रस्टमधील एका सदस्याने बनावट कागदपत्रे तयार करून ट्रस्टच्या मालकीच्या जमिनीवरून ट्रस्टच्या नावाची नोंद हटवली. त्यानंतर त्याने या जागेच्या मोबदल्यात सिडकोकडे साडेबारा टक्के योजनेंतर्गत भूखंडांची मागणी केली. खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून या ट्रस्टीने काही भूखंड बिल्डरांना विकून टाकले. त्यामुळे ट्रस्टचे सुमारे 80 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे ट्रस्टची जमीन खरेदी करणार्यांमध्ये अनेक नामवंत बिल्डरांचा समावेश आहे. उरणचे भाजप आमदार महेश बालदी यांनीही 2018 भिवंडीवाला ट्रस्टची सुमारे 22 एकर जागा 16 कोटी 45 लाख रुपयांना खरेदी केली. हे सर्व व्यवहार बेकायदा झालेले असल्यामुळे याप्रकरणी ट्रस्टच्या प्रतिनिधी फरिदा दुबाश यांनी मुंबईतील एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या चौकशीमुळे आ. महेश बालदी यांच्यासह जागा घेणार्या अन्य बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. आ. बालदी यांनी दोसू भिवंडीवाला याच्याकडून जमीन घेतली असून दोसू यांचे नाव एफआयआरमध्ये आरोपी म्हणून आहे.
- ट्रस्टमधील एका सदस्याने बनावट कागदपत्रे तयार करून ट्रस्टच्या मालकीच्या जमिनीवरून ट्रस्टच्या नावाची नोंद हटवली
- या जागेच्या मोबदल्यात सिडकोकडे साडेबारा टक्के योजनेंतर्गत भूखंडांची मागणी
- खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून या ट्रस्टीने काही भूखंड बिल्डरांना विकले त्यामुळे ट्रस्टचे सुमारे 80 कोटी रुपयांचे नुकसान
- भाजप आमदार महेश बालदी यांनीही 2018 भिवंडीवाला ट्रस्टची सुमारे 22 एकर जागा 16 कोटी 45 लाख रुपयांना केली खरेदी
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai