साकवरली जड वाहतुक बंद न केल्यास आंदोलन
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 13, 2022
- 588
चाणजे शेतकरी संघर्ष समितीचा प्रशासनाला इशारा
उरण ः रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील मौजे चाणजे येथील द्रोणागिरी धारण तलाव क्र.2 वर शेतजमीनीच्या सुरक्षितेसाठी असलेले साकव वरून बेकायदेशीररित्या जडवाहतूक सुरु आहे. येथे जड वाहनांना बंदी असूनही जड वाहनांची वाहतूक नेहमी सुरु असल्याने हे जड वाहतूक थांबवून हाईट गेज पूर्ववत करून साकवचे अस्तित्व अबाधित ठेवावेत अन्यथा चाणजे शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बाधित शेतकर्यांनी प्रशासनाला दिला आहे. लवकरात लवकर हा प्रश्न सोडविण्याची मागणी बाधित शेतकर्यांनी केली आहे.
शेत जमीन सुरक्षितेसाठी सिडकोने मौजे-चाणजे, ता. उरण येथील शेतकर्यांच्या जमिनी संपादन न करता शेतकर्यांच्या सर्व्हे नं.418,422,423 या जमिनीवर साकव बांधले. साकवच्या सुरक्षितेसाठी साकव वरून जडवाहतूक न होण्यासाठी हाईट गेज लावण्यात आले होते. परंतु महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड व सिडको कार्यालय यांच्याकडून करंजा टर्मिनल कंपनीस फक्त 2016 चा पावसाळा होईपर्यंत हाईट गेज काढून 25 टन पर्यंत वजनाच्या वाहतुकीस पत्राद्वारे परवानगी देण्यात आली होती. परंतु तेव्हापासून ते आत्तापर्यंत हाईट गेज लावण्यात आलेले नाही. परिणामी करंजा टर्मिनल कडून जडवाहतूक बेकायदेशीररित्या होत आहे. त्यामुळे संबंधित साकवचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. चाणजे शेतकरी संघर्ष समिती कडून संबंधित प्रशासकीय अधिकारी यांना वारंवार पत्रव्यवहार करून देखील या गंभीर विषयाची दखल घेण्यात आलेली नाही परिणामी संघटनेकडून हायकोर्टमध्ये जनहित याचिका टाकण्यात आली आहे. तसेच करंजा टर्मिनल कंपनी कडून संबंधित साकव वरून बेकायदेशीररित्या जडवाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे जडवाहतूक थांबवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून हाईट गेज पूर्ववत करण्यात यावे. अन्यथा बाधित शेतकर्यांद्वारे तीव्र आंदोलन करण्यात येईल व होणार्या परिणामास संबंधित प्रशासन जबाबदार राहील असा इशारा बाधित शेतकर्यांच्या वतीने चाणजे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश म्हात्रे यांनी दिला आहे. स्थानिक प्राधिकरणांसह शासनस्तरावर याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. येत्या 15 दिवसाच्या आत प्रश्न सुटला नाही तर चाणजे शेतकरी संघर्ष समिती तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai