शैक्षणिक साहित्य 50 टक्क्यांनी महाग
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 16, 2022
- 927
मुंबई ः देशभरात वाढत्या महागाईचा परिणाम आता वही-पुस्तके आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होऊ लागला आहे. वही-पुस्तकांचे दर 35 ते 50 टक्क्यांनी वाढले आहेत. याशिवाय दोन वर्षांनंतर जास्त मागणी असल्याने बाजारात पुस्तकांचा तुटवडा जाणवत आहे.
नवीन शैक्षणिक सत्र एप्रिलपासून सुरू झाले आहे. आता पुस्तके, ड्रेस, बूट आदींच्या किंमतीत 50 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत पालकांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. याशिवाय शालेय दप्तरांच्या किमतीत 100 ते 150 रुपयांनी वाढ झाली आहे. पादत्राणांवर जीएसटी दर 5 वरून 12 टक्के करण्यात आल्यानंतर शालेय चपलांच्या किमती 150 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. व्यापार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वही पुस्तके तयार करण्यासाठी लागणार्या कच्च्या मालाच्या किंमती कोरोनाच्या काळात अधिक वाढल्या आहेत. त्याचबरोबर कागदाचे दर 50 रुपयांवरून 85 रुपये किलो झाला आहे. पूर्वी जे वही-पुस्तकांचे संच सरासरी तीन हजार रुपयांना मिळायचे, ते यंदा पाच हजार रुपयांना विकले जात असल्याचे व्यापार्यांचे म्हणणे आहे. तसेच खासगी प्रकाशकांचे गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांचे जे पुस्तकं 300 ते 325 रुपये किंमतीचे होते ते आता 400 रुपयांवर गेले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai