वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 28, 2022
- 631
205 प्रकरणे उघडकीस ; 49.57 लाखाची वीजचोरी पकडली
मुंबई ः महावितरणची सध्यस्थिती आर्थिकदृष्ट्या गंभीर आहे. वीजबिलाची थकबाकी वाढत चाललेली आहे तसेच कोळशाच्या टंचाईमुळे वीजनिर्मितीवर परिणाम होत आहे. दुसरीकडे, उकाडा प्रचंड वाढल्यामुळे विजेची मागणी दिवसंदिवस वाढत आहे. अशा बिकट परिस्थितीत विजेचे योग्य नियोजन करणे जितके आवश्यक आहे तितकेच आवश्यक अनधिकृत विजेचा वापर रोखणे आहे. त्यामुळे महावितरणच्या भांडूप परिमंडलात वीजचोरी पकडण्याची कारवाई सतत सुरू असते. त्यानुसार, एप्रिल 2022 या एका महिन्यात भांडूप परिमंडलातील ठाणे, वाशी व पेण मंडळात कलम 126 अंतर्गत 40 प्रकरणे तर कलम 135 व 138 अंतर्गत 165 प्रकरणे उघडकीस आली असून 49.57 लाखाची वीजचोरी पकडण्यात आली आहे.
मीटरमध्ये फेरफार करणे, रिमोटद्वारे वीजचोरी करणे अथवा वीज तारांवर काटा टाकून वीजचोरी केली जाते. वीज कायदा 2003 अन्वये ठाणे मंडळात कलम 126 अंतर्गत 14.77 लाखाची 12 प्रकरणे, पेण मंडळात कलम 126 अंतर्गत 4.50 लाखाची 9 प्रकरणे, वाशी मंडळात कलम 126 अंतर्गत 23.18 लाखाची 19 प्रकरणे अशी एकूण 40 प्रकरणे उघडकीस आली आहे. तसेच, कलम 135 व कलम 138 मिळून ठाणे मंडळात 6.30 लाखाची 22 प्रकरणे, पेण मंडळात 4.07 लाखाची 43 प्रकरणे तर वाशी मंडळात 16.06 लाखाची 100 प्रकरण असे एकूण 165 प्रकरण समोर आले आहेत. वीजचोरी एक कीड असून महावितरणचेच नव्हे तर ग्राहकांचे ही नुकसान होत आहे. ग्राहकांनी अधिकृतपणे वीज वापर करावे व वापरलेल्या विजेचे बिल नियमितपणे भरावे असे आवाहन भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे. तसेच याप्रकारे कोणी जर मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करीत असल्याचे आढळल्यास, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्य अभियंता गणेशकर यांनी दिला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai