‘21 व्या शतकातील विज्ञाननिष्ठ महाराष्ट्र’ सुसंवाद
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 28, 2022
- 666
नवी मुंबई ः महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अणुऊर्जेच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या ‘21 व्या शतकातील विज्ञाननिष्ठ महाराष्ट्र’ या महत्वाच्या विषयावरील सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
01 मे 2022 रोजी, सायं. 5.00 वा., वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहात सुसंवाद कार्यक्रम संपन्न होणार असून यामध्ये दै.लेाकमत (सेंट्रल डेस्क) संपादक विनायक पात्रुडकर हे अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्याशी सुसंवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय अणुऊर्जा मंडळाचे अध्यक्ष आणि भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे प्रमुखपद भूषविलेले ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या प्रेरणादायी विचारांचा लाभ देशाचे भविष्य असणार्या युवा पिढीला व्हावा व विज्ञाननिष्ठ समाजनिर्मितीसाठी विचारमंथन व्हावे ही भूमिका नजरेसमोर ठेवून हा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध शाळा, महाविदयालये यामधील विदयार्थी व शिक्षक मोठया संख्येने सहभागी होणार आहेत. तसेच समाजातील वैज्ञानिक साक्षरता वाढून महाराष्ट्र राज्याच्या व भारत देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दिशा मिळावी या दृष्टीनेही हा सुसंवाद नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. यावेळी उपस्थित विद्यार्थी तसेच श्रोत्यांना त्यांच्याशी थेट संवाद साधता येणार आहे.
ऊर्जा क्षेत्रात संपूर्ण जगभरात नावलौकीक असणारे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचे मार्गदर्शक विचार ऐकण्यासाठी व त्यामधून प्रेरणा घेण्यासाठी नागरिकांनी व त्यातही विशेषत्वाने, कुमारवयीन मुलांनी व युवकांनी या कार्यक्रमाप्रसंगी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai