पनवेलमध्ये भाजपचे लाक्षणिक उपोषण
- by Aajchi Navi Mumbai
- May 25, 2022
- 487
पनवेल : महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळे राज्यातील ओबीसी समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले असून या निष्क्रिय कारभाराचा पनवेलमध्ये लाक्षणिक उपोषण करून जाहीर निषेध करण्यात आला. मध्य प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसींचे आरक्षण पुनर्स्थापित केले त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार का करू शकत नाही याचा जाब या आंदोलनातून सरकारला विचारण्यात आला.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाच्या आरक्षणाची राजकीय हत्या करून ओबीसी समाजास दडपण्याचे षडयंत्र रचले आहे. त्या निषेधार्थ तसेच मध्य प्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारला लोकशाही मार्गाने ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करण्यास भाग पाडण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप ओबीसी मोर्चातर्फे 23 मे रोजी पनवेल प्रांत कार्यालय येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. तसेच ओबीसी आरक्षण लागू करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पाऊले उचलावीत, असे निवेदन यावेळी प्रांत अधिकारी मार्फत राज्य सरकारला देण्यात आले. या आंदोलनात भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, महापौर डॉ. कविता चौतमोल, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, उपमहापौर सीता पाटील, सभागृहनेते परेश ठाकूर, माजी उपनगराध्यक्ष सुनिल घरत, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अड. मनोज भुजबळ, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, प्रभाग समिती सभापती वृषाली वाघमारे, काही नगरसेवक यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai