नाल्याच्या जमिनीवर अतिक्रमण
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 10, 2022
- 583
विकासकांच्या फायद्यासाठी पालिकेने केला नाल्याचा प्रवाह बंद
नवी मुंबई ः घणसोली सेक्टर 9 येथील पामबीच मार्गालगत असलेला नाल्यावर विकासकांनी अतिक्रमण केल्याचे उघडकीस आले आहे. पालिकेच्या अभियांत्रिकी विभागानेही या नाल्याचे तोंड भिंत बांधुन बंद केले आहे. विकासकांच्या फायद्यासाठी पालिका अधिकार्यांनी या नाल्याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र हडकर यांनी केला आहे.
पामबीच मार्गालगत पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी घणसोली सेक्टर 9 येथे सिडकोने छोटा नाला सोडला होता. सेक्टर 9,10 व 11 मधील पावसाचे पाणी या नाल्यात सोडून ते लगतच्या मोठ्या नाल्यात सोडण्याचे नियोजन सिडकोने केले होते. या नाल्यालगत सिडकोने अनेक भुखंड विकासकांना दिले असून त्यांनी भुखंड विकसीत करताना हा नाला ठिकठिकाणी बुजवल्याचे समोर आले आहे. हा नाला बुजवून विकासकांनी आपल्या भुखंडाकडे येण्या-जाण्याचा रस्ता बनवला आहे. सिडकोनेही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या मालकंस या प्रकल्पातही असाच प्रकार झाल्याचे समोर आले आहे.
सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र हडकर यांनी याबाबत महापालिका व सिडकोकडे तक्रार केली असता कोणत्याही विभागाने त्याची दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नवीन विकास नियंत्रण नियमावलीनुसार नाल्याच्या कडेने सहा मीटर अंतर सोडून बांधकाम करणे अपेक्षित असताना लगतच्या नाल्यावरच पत्रे लावल्याचे दिसत आहे. पालिकेनेही स्वा. वि.दा. सावरकर जॉगिंग पार्क विकसीत करताना हा नाला बुजवल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे भविष्यात घणसोली विभागातील सेक्टर 9, 10 व 11 मध्ये पावसाचे पाणी तुंबण्याची भिती व्यक्त होत आहे. तसेच मोठ्या नाल्याची सफाईसुद्धा पुर्ण करण्यात आलेली नाही. विकास आराखड्यातील कच्चा नाला बुजवण्याचे काम करणार्या विकासकांवर व पालिका अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी हडकर यांनी केली आहे.
- पावसाळ्यात पाणी साचून शहरात आपत्ती ओढावू नये यासाठी पावसाळी पुर्व कामे करुन नाले व गटार सफाई करण्यात येते. मात्र घणसोलीतील या नाल्याची सफाई पालिकेकडून करण्यात आलेली नाही.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai