गणेशमुर्तींच्या उंचीची मर्यादा शिथील
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 23, 2022
- 683
मुंबई : गणेशोत्सव साजरा करण्याच्या मार्गदर्शक सूचना गेल्या आठवड्यात पालिकेने जाहीर केल्या. यामध्ये गतवर्षीप्रमाणे यंदाही मुर्तींच्या उंचीवर मर्यादा कायम ठेवली होती. मात्र मुंबईत उंचीवर मर्यादा नसताना केवळ नवी मुंबईत निर्बंध कायम ठेवल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आयुक्तांची भेट घेऊन सदर अट शिथील करण्याची मागणी केली होती. यावर आयुक्तांनी 4 फुट उंचीची मर्यादा शिथील केली आहे. तसेच सार्वजनिक मंडळांच्या श्री गणेश मूर्तींची उंची शक्य तितकी कमी असावी असे आवाहन केले आहे.
गेली दोन वर्षे कोरोनाकाळात गणेशोत्सवावर निर्बंध होते. आता कोरोना निर्बंधही शिथिल करण्यात आलेले आहेत. मात्र पालिका प्रशासनाने करोनाकाळातील गणेशमूर्ती उंचीवरील निर्बंध कायम ठेवल्याने संताप व्यक्त होत आहे. पालिकेने निर्बंध मागे घेण्याची मागणी मंडळांनी आयुक्तांना निवेदन देऊन करण्यात आली होती. त्यामुळे आयुक्तांनी सदर अट शिथील करून सुधारित अटी जाहीर केल्या असून ‘श्री गणेशोत्सव’ पर्यावरणशील पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
- ‘पीओपी’ मूर्ती ऐंवजी शाडू माती पासून घडविलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी.
- घरगुती श्री गणेश मूर्तीची उंची 2 फूटांपेक्षा अधिक नसावी, जेणेकरुन अशा मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे सोयीचे होईल.
- सार्वजनिक मंडळांच्या श्री गणेश मूर्तींची उंची देखील शक्य तितकी कमी असावी.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai